शेतीसाठी महिला शेतकऱ्यांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. काळ्या मातीशी स्त्रीचे नाते हे फार जुने आहे. त्यामुळे सरकार देखील शेतकरी महिलांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी बऱ्याच योजना राबवतात. यातून महिलांचे स्वतःचे अस्तित्व टिकून राहते. मात्र शेतकरी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो यासाठी सरकार उपाययोजना राबवण्यास प्रयत्नशील असते.
आता कोरोना काळात विधवा झालेल्या राज्यभरातील शेतकरी महिलांनाबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या गरजेनुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोफत खते आणि बियाणे देण्यात येईल. व यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचं प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
मध्यंतरी राज्य सरकारने विधवा तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान मदत व्हावी तसेच त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी 'ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे', हा उपक्रम प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात आला होता.
आज विधान भवनामध्ये विधान परिषद उपसभापती कार्यालयात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी संवांद साधला.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून एकल महिलांना पावसाळ्यापूर्वी मोफत खते आणि बियाणे देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. कोविड काळातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील 20 जिह्यांमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आणि कोरोना काळात
शेतकऱ्यांचा ऊस गेला वाळून आता तोडूनही होणार नाही उपयोग; अजूनही कारखाने सुरु
विधवा झालेल्या शेतकरी महिलांच्या कुटुंबांवर ओढवलेल्या संकटाचा विचार करण्यात आला. त्यातून शेतकरी महिलांना राज्य शासनाच्या वतीने बी-बियाणे आणि खते मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी विनंती त्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्यावर योग्य कार्यवाही करण्याबाबत त्यांनी आश्वासित केले आहे. कृषी विभागाने एकल महिलांना दिलासा देण्यासाठी तयारी दाखवल्यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आता कोल्हापूर सांगलीत पूर येणार नाही, अलमट्टी धरणाबाबत झाली महत्वपूर्ण बैठक
मोदी सरकारचा हरभरा उत्पादकांना मोठा धक्का; खरेदीवर केली बंदी;अजित पवार आक्रमक
Share your comments