1. बातम्या

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना खते आणि बियाण्यांचे मोफत वाटप

मालेगाव तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनने उभारी कार्यक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी या मदतीचे वाटप करत असतानाऍग्रो डीलर्स असोसिएशनचे कौतुक केले.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
खते आणि बियाण्यांचे मोफत वाटप

खते आणि बियाण्यांचे मोफत वाटप

 मालेगाव तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनने उभारी कार्यक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी या मदतीचे वाटप करत असतानाऍग्रो डीलर्स असोसिएशनचे कौतुक केले.

गेल्या काही वर्षांपासून मालेगाव तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात देत आहे. यावर्षीही दरवर्षाप्रमाणे खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी भुसे म्हणाले की,शेतकरी आत्महत्या ही घटना क्लेशदायक ठरत असते. कोरोना काळामध्ये अशा कुटुंबीयांना मदतीची गरज होती तेव्हा सामाजिक बांधिलकी जपत ऍग्रो डीलर्स असोसिएशनने मदतीचा हात पुढे करून एक आदर्श निर्माण केला आहे. इतरांनीही पुढाकार घेऊन अशा कुटुंबीयांची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

 

तसेच पुढे बोलताना कृषिमंत्री म्हणाले की,शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा खतांच्या वाढत्या किमती बाबत शासन संवेदनशील आहे.तसेच रासायनिक खतांच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत तसेच येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांचे योग्य नियोजन केले आहे, तसेच ग्रामपातळीवर सुद्धा समिती स्थापन केल्याची माहित यांनी दिली.या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मालेगाव तालुक्यातील टेहरे  येथील संगीता शेवाळे व खडकी येथील निंबा बाई शेळके यांना बियाण्यांचे खतांचे वाटप करण्यात आले.

 

इतर लाभार्थ्यांना घरपोच मदत दिली जाणार आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी विजयनंद शर्मा,उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, गोकुळ अहिरे, सभापती राजेंद्र जाधव व उपसभापती सुनील देवरे, शिवसेनेचे संजय दुसाने, विनोद वा, अशोक देसलेइत्यादी मान्यवर उपस्थित होते.

English Summary: Free distribution of fertilizers and seeds to farmer suicidal families Published on: 28 April 2021, 11:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters