1. बातम्या

'युवा शेतकरी नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत शेती व्यवसाय वृद्धिंगत करत आहेत'

डॉ. व्ही. सदामते, माजी कृषी सल्लागार, नियोजन आयोग यांनी आज कृषी जागरण मीडिया हाऊसला भेट दिली. कृषी जागरणचे मुख्य संपादक एम सी डॉमिनिक, संचालक शायनी डॉमिनिक आणि इतर टीम सदस्य तसेच कृषी जागरणचा कृषी पत्रकार वर्ग यावेळी उपस्थित होता. एक लहान रोप देऊन डॉ. सदामते यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. सदामते हे नियोजन आयोगाचे माजी कृषी सल्लागार आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
डॉ. व्ही. सदामते यांची कृषी जागरणला भेट

डॉ. व्ही. सदामते यांची कृषी जागरणला भेट

डॉ. व्ही. सदामते, माजी कृषी सल्लागार, नियोजन आयोग यांनी आज कृषी जागरण मीडिया हाऊसला भेट दिली. कृषी जागरणचे मुख्य संपादक एम सी डॉमिनिक, संचालक शायनी डॉमिनिक आणि इतर टीम सदस्य तसेच कृषी जागरणचा कृषी पत्रकार वर्ग यावेळी उपस्थित होता. एक लहान रोप देऊन डॉ. सदामते यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. सदामते हे नियोजन आयोगाचे माजी कृषी सल्लागार आहेत. त्यांना कृषी क्षेत्रात 45 वर्षांचा अनुभव आहे.

लहान रोप देऊन डॉ. सदामते यांचे स्वागत

लहान रोप देऊन डॉ. सदामते यांचे स्वागत

डॉ. सदामते हे कृषी महाविद्यालयातून पदवीधर झाले असून भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), नवी दिल्ली येथून त्यांनी पीएचडी केली आहे.त्यांनी कृषी जागरण च्या पत्रकारांसोबत त्यांचे अनुभव व्यक्त केले. तसेच अनुभव सांगताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतीपद्धतीबाबतही खास उल्लेख केला. कृषी जागरणच्या पत्रकारांशी, इतर टीम सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी कृषी तंत्रज्ञान यंत्रणा आणि शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले. तसेच उद्योग, राज्य आणि स्थानिक सरकारे, शैक्षणिक संस्था आणि इतर फेडरल एजन्सींसोबत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण याबाबत माहिती दिली.

संशोधन संस्थांकडून माहिती मिळवणे आणि तीच माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे जेणेकरून यामार्फत शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. "सोबतच, संशोधकांनी दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांना किती मदत झाली याबद्दल शेतकरी सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया असतात .त्यामुळे त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहणे गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते असंही म्हणाले की, KVK देखील शेतकऱ्यांना मदतीचा एक मोठा स्रोत आहे.

KVK मुळे नवीन तंत्रज्ञान आणि पिकांच्या नवीन किंवा सुधारित वाणांची महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होते.शेती व्यवसायाबाबत सांगताना ते म्हणाले की, शेती हा केवळ पीक उत्पादन आणि शेतातील कामाशी संबंधित आहे असे मानले जाते मात्र हा एक व्यापक उद्योग आहे ज्यामध्ये फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम आणि इतर गोष्टींचाही समावेश असतो.

अनुभव सांगताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतीपद्धतीबाबतही खास उल्लेख केला

अनुभव सांगताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतीपद्धतीबाबतही खास उल्लेख केला

सध्या युवा शेतकरी नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत शेती व्यवसाय वृद्धिंगत करत आहेत. सध्याचे तरुण शेतकरी कृषी व्यवसाय आणि स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही याचा सकारात्मक परिणाम होत आहे.कृषी जागरण मीडिया हाऊस मध्ये मासिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा झाला. त्यांनी जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचे स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन केले.

नवनियुक्त मुख्यमंत्री शेती बाबत 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये...

मासिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा

मासिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा

महत्वाच्या बातम्या
माणुसकीचे दर्शन! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला गायीचा जीव; काय आहे प्रकरण वाचा..
"ईकडे आड तिकडे विहीर", पिके तरतरली तर दुसरीकडे खतांच्या किंमती वाढल्या; सांगा शेती कशी करायची?

English Summary: Former Agricultural Advisor Dr. V. Sadamate's visit to Krishi Jagran; Interaction with agricultural journalists Published on: 04 July 2022, 06:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters