जशी सोयाबीन च्या दरात घट होत आहे त्याप्रमाणे कापसाच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. हि दोन्ही पिके खरिपात घेतली जातात जी की उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची मानली जातात. मराठवाडा मध्ये अधिक च्या क्षेत्रावर सोयाबीन चे उत्पन्न घेतले जाते तर खानदेश मध्ये कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावेळी पावसामुळे सोयाबीन चे जरी नुकसान झाले असले तरी कापसाला मात्र विक्रमी भाव भेटत आहे.
१ लाख क्विंटल कापसाची आवक:-
चक्क बाहेरच्या राज्यातील व्यापारी पांढर सोन घेण्यासाठी खानदेशात पोहचले आहेत. सोयाबीन चे नुकसान झाले असले तरी धुळे, पाचोडा, चोपडा, जामनेर येथील शेतकऱ्यांना कापसाने आर्थिक आधार दिला आहे. प्रति क्विंटल ला ८२५० असा दर तेथील केंद्रावर भेटत आहे.खानदेश मध्ये दिवसाआड सुमारे १ लाख क्विंटल कापसाची आवक होते. खानदेशात जिनिंग प्रक्रिया सुरू झाल्याने कापसाला चांगला दर मिळाला आहे. डिसेंबर पर्यंत कापसाचे दर स्थित राहतील आणि त्यानंतर यामध्ये सुधारणा होईल. शेतकरी हळुवार पद्धतीने कापूस विक्रीसाठी आणत आहेत.
उत्पादन कमी अन् मागणी अधिक:-
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे तोडणी ला सुरुवात झाली की मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली. खानदेशात कापूस खरेदी साठी गुजरात तसेच मध्यप्रदेश मधील एजंट आले आहेत. तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल या भागात कापसाला चांगल्या प्रमाणत दर मिळत आहे. गुजरात, मध्यप्रदेश मध्ये या भागातून लवकर पाऊस पोहचतो. भविष्यात कापसाचे दर वाढतील म्हणून शेतकरी कापूस बाहेर काढत नाहीत.
असे वाढत गेले दर:-
सोयाबीन च्या दरात ज्याप्रमाणे घट झाली त्याप्रमाणे इकडे कापसाच्या दरात विक्रमी वाढ झाली. सप्टेंबरमध्ये सुरुवातीस ५२०० तर अखेरीस ६२००, ऑक्टोम्बर मध्ये ६५००, ६८००, ७०० अशी वाढ झाली आणि ती अजूनही कायम आहे. मागील दोन ते तीन दिवसात भडगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा या भागात ८२५० रुपये प्रति क्विंटल ने कापसाच्या दरात वाढ झाली.
Share your comments