राज्यात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहत असताना आता काल राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे देशाचे राष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 21 जुलैपर्यंत देशाला नवे राष्ट्रपती ( New President Of India ) मिळणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नव्या राष्ट्रपतींसाठी सध्या पाच नावं ही चर्चेत आहे. ही पाचही चर्चेतली नावं ही महिलांची (Women President Of India) आहेत. त्यामुळे देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार का? असेही बोलले जात आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना बहुमान मिळाला होता. आता देखील महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीची तयारी आता निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. यामध्ये माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे नाव आघाडीवर आहे, सुमित्रा महाजन यांचा जन्म कोकणातील आहे. इंदोरच्या जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यानंतर मध्य प्रदेशमधूनच राजकीय आखाड्यात आल्या. त्यांनी इंदौरमधून 1989, 1991, 1996, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 रोजी संसदेत निवडून आल्या. त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे. यामुळे त्यांचा विचार होऊ शकतो.
शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र, साखर कारखान्यांबाबत म्हणाले..
गेल्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकरणात आले होते. तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे नाव देखील आघाडीवर आहे, आनंदीबेन पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत, यामुळे त्यांचा देखील विचार होऊ शकतो. छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके याचे नाव देखील आघाडीवर आहे. त्यांना देखील मोठा अनुभव आहे. आदिवासी महिला म्हणून त्यांचा बहुमान केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांनो उसाची नोंदणी झाली नसेल तर काळजी करू नका, साखर आयुक्तालयाने घेतला मोठा निर्णय
तसेच तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांचे नाव देखील आघाडीवर आहे. झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांचे देखील नाव आघाडीवर आहे, देशात आजपर्यंत आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदापर्यंत कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी ही दोन्ही नावं आघाडीवर आहे. सध्या विरोधी काँग्रेस पक्षाने देखील सर्व विरोधी पक्षांचा एकच उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न आहे, यासाठी काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! आण्णा हजारे लवकरच करणार संघटनेची घोषणा? चर्चांना उधाण
घोडगंगाच्या मतदार यादीत मृत सभासदांची नावे, कारखान्याने सर्वे केलाच नाही
आता रेशनच्या दुकानातही मिळणार भाज्या आणि फळे, विक्रीला परवानगी
Share your comments