मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करणार

Thursday, 05 September 2019 07:59 AM


मुंबई:
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. मंत्रालयात मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

मोर्शी तालुक्यात शासकीय जागेत लवकरच मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू होणार असून याबाबतची आवश्यक कार्यवाही लवकर करून जाहिरात प्रसिद्ध करावी. तसेच महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करून आवश्यक ती डागडुजी व साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश डॉ. बोंडे यांनी यावेळी दिले.

यावेळी पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्य व्यवसाय आयुक्त राजीव जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. पातुरकर, कुलसचिव चंद्रमान पराते व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

fishery morshi मोर्शी मत्स्य विज्ञान डॉ. अनिल बोंडे Dr. Anil Bonde

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.