जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी या गावात केळीच्या बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागून पिकांचे नुकसान होताना पाहिले जाते विशेष करून ऊसाला अनेकदा शॉर्टसर्किटमुळे आग लागलेली आहे. केळी हे बारमाही बाजारात उपलब्ध असलेले पिक आहे पण सध्या उन्हाचे प्रमाण वाढल्यामुळे केळीची मागणी वाढली होती.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी येथे महेश पाटील यांनी ७ हजार ५०० केळींच्या झाडाची लागवड केली होती व त्यांना अंदाजित १५ लाख रुपये उत्पादनाची अपेक्षा होती. खोडाची कापणी करत असतानाच आग लागली.
शेतात इतर बागेत जाणारी पाईपलाइन तसेच ठिबक होते, त्याचेही नुकसान झाले. अतिशय मेहनतीने त्यांनी बाग लावली होती. पण सर्व बाग काही वेळात नष्ट झाली. अनेक संकटांचा सामना करत शेतकरी शेती करत असतो, यामध्ये अवकाळी असेल, वातावरण बदल असेल किंवा रोगराई या सर्व संकटाचा सामना शेतकरी करत असतो.
असे संकट आल्यावर शेतकरी हवालदिल होतो, त्यांच्या स्वप्नावर पाणी पडते त्यामुळे या शेतकऱ्याला शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठे असून सध्या केळीला चांगला भाव मिळत आहे.
अनेक ठिकाणी अश्या घटना घडतात, त्यामुळे अशा घटना घडल्यास त्या शेतकऱ्याला शासनाने मदत करणे आवश्यक आहे. अवकाळी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत बाग त्यांनी जगवली होती. पण संपूर्ण बाग नष्ट त्यांच्यावर संकट आले.
महत्वाच्या बातम्या
लाजाळूचे हे गुणधर्म तुम्हाला माहित आहेत काय
Pineapple Farming : अननस शेती शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर; बारामाही केली जाते लागवड
Share your comments