भारतात सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे शार्क टॅंक इंडिया या जगातील नंबर वन बिजनेस रियालिटी शो ची. भारतात एक युवा व नवीन पिढीला त्यांच्या विचारसरणीला एक नवीन मंच तयार झालेला आहे. शार्क टॅंक इंडिया हा बिजनेस रियालिटी शो होतकरू व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. हा रियालिटी शो नव्या उद्योजकांना स्वतः तयार केलेले जे यंत्र आहे जे की जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाची कल्पना तुम्ही त्यांच्यापुढे मांडायची जे की त्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आणि हा शो तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी संधी देतो. मात्र या शो मधील जज याना प्रभावित करायचे असेल तर तुम्हाला योग्य प्रकारे पिंचिंग करावे लागते.
मालेगावचा जुगाडू कमलेश :-
शार्क टॅंक इंडिया च्या शो मध्ये अनेक स्पर्धक आपल्या नवीन नवीन कल्पना किंवा व्यवसाय घेऊन येत असतात. या स्पर्धकांमध्ये एक महाराष्ट्र राज्यातील मालेगाव मधील एक युवा तरुण उद्योजक सहभागी झाला होता. कमलेश असे या तरुणाने नाव होते. कमलेश ने कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी एक प्रॉडक्ट तयार केले होते. जे की शेतकऱ्यांना शेतीमध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जे की याच समस्येचे निर्वाकरण करण्यासाठी जुगाडू कमलेश कीटकनाशक फवारणीसाठी हे प्रॉडक्ट तयार केले होते. फवारणी दरम्यान हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांची समस्या कमी करेल अशी माहिती कमलेश जज समोर दिली.
जुगाडू कमलेश च्या यंत्राचा असा होतोय शेतकऱ्यांना फायदा :-
किटकनाशकची फवारणी करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे की फवारणी करताना अनेक वेळा उलटे वारे वाहत असले की ते औषध तोंडावाटे तसेच डोळ्यावाटे आपल्या शरीरात जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच त्या पंपाचे वजन देखील खूप असते त्यामुळे शेतकरी कंटाळून जातो. पण कमलेश ने जे यंत्र बनवले आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना असा की
१. फवारणी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पंप पाठीवर घ्यायचा नाही.
२. शेतकरी यंत्रावर बसून फवारणी करू शकतो.
३. यंत्राद्वारे फवारणी केल्याने कोणत्याही प्रकारचे विषाणू घटक आपल्या शरीरात जाणार नाहीत.
४. पाहिजे अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे यंत्राद्वारे फवारणी करू शकता.
५. कमी वेळेत जास्त फवारणी तसेच शेतकऱ्यांचे कष्ट ही कमी होत आहे त्यामुळे अनेक शेतकरी या यंत्राला आपली पसंदी देत आहेत.
का होतोय नमिता थापर यांना पश्चाताप :-
नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकलच्या Executives आहेत. जे की शार्क टॅंक इंडिया या बिजनेस शो मध्ये त्या जज म्हणून सहभागी झाल्या आहेत. नमिता थापर यांनी या शो मध्ये १७० बिजनेस आयडिया आतापर्यन्त ऐकल्या आहेत जे की त्यापैकी नमिता थापर यांनी २५ व्यवसायांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. मात्र मालेगावच्या जुगाडू कमलेश च्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक न केल्याने त्यांना आता पश्चाताप होत आहे. ज्यावेळी नमिता यांनी यावर विचार केला तेव्हा त्यांना समजले की हे यंत्र खर्च फायदेशीर आहे जे की यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे होते. यंत्र न विकण्यामागे एकच कारण होते ते म्हणजे कमलेश ला योग्य मार्गदर्शन भेटले नाही. सध्या त्यांना तोच पश्चाताप होत आहे.
पियुष बन्सल यांनी दिले बिनव्याजी कर्ज :-
लेन्सकार्टचे कंपनीचे संस्थापक पीयूष बन्सल हे सुद्धा शार्क टॅंक इंडिया मध्ये जज म्हणून सहभागी झाले आहेत. पियुष बन्सल यांनी शोमध्ये जुगाडू कमलेशच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. पियुष यांनी जुगाडू कमलेशला 40% इक्विटीवर 10 लाख आणि 20 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले आहे.
Share your comments