आपल्याला माहिती आहे की कोरोना काळात राज्याचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या हातचे जॉब गेले. काम नव्हते. लॉकडाऊन पडले होते. राज्याच्या आर्थिक गाडा देखील थंडावला होता. उद्योगधंद्यावर मंदीचे सावट होते, अशा बिकट परिस्थितीत राज्याचा आर्थिक गाडा अजित पवारांनी उत्तमरीत्या संभाळला.
यामुळे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कॅगच्या अहवालात (CAG Report) कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी योग्य नियोजन करून त्याठिकाणी राज्य सावरले. यामुळे राज्याची राजकोषीय तूट (Fiscal Deficit) कमी करण्यात राज्य सरकारला यश आल्याचं अहवालामध्ये म्हटले आहे.
या सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवार यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कोरोनात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला.
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन होणार? मोदी सरकारचा निर्णय
यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले, राज्य सरकारचे देखील उत्पन्न कमी झाले. यामुळे विकासकामे देखील कमी झाली. मात्र इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्याला मोठा आर्थिक फटका बसला नाही, कारण म्हणजे अजित पवारांचे नियोजन होते.
असे असले तरी राज्यावरील कर्ज हे सध्या ५ लाख ४८ हजार १७६ कोटींवर गेले आहे. कोरोना काळातही राज्यातला बळीराजा शेतात घाम गाळत असल्याने राज्याला कृषी क्षेत्राने तारले असल्याची माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ड्रायव्हर..
Mohit kamboj: बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरु, आता रोहित पवार अडचणीत येणार?
'खाऊन 50 खोके माजलेत बोके, ईडी ज्याच्या दारी तो भाजपच्या दारी'
Share your comments