गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
यावर्षी मोठा उन्हाळा असल्याने अनेकांचे पावसाकडे लक्ष लागले होते. अखेर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यामध्ये कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. शेतकरी शेतात मशागत करत आहेत.
मक्याच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण, शेतकरी अडचणीत..
दरम्यान, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा पाऊस उशिरा दाखल होणार अशी माहिती दिली जात होती.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, तुझाही दाभोळकर करु...! सुप्रिया सुळे आयुक्तालयात
यामुळे शेतकरी चिंतेत होते. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे त्यांचे पावसाकडे लक्ष लागले होते.
जगातील सर्वात लहान गाय 'पुंगनूर' हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर..
तूरडाळीचे भाव पुन्हा वाढले! शेतकऱ्यांना अच्छे दिन...
बिपरजॉय चक्रीवादळाचा जोर वाढला! मुंबई, रायगडसह 'या' किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा
Share your comments