गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात राज्यपालांविरोधात संतप्त भावना आहे.
यामुळे त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही राज्यपाल कोश्यारींना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे.
यामुळे आता याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या गुजरात विधानसभा निवडणूक सध्या तोंडावर आली आहे. त्यामुळे केंद्रीय भाजपा नेतृत्व सध्या तिकडे व्यस्त आहे. त्यामुळे कोश्यारींना काही वेळ मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
आता सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले, अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण..
गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी होणार आहे. याबाबत खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. यामुळे भाजपला फटका बसेल अशी भीती नेत्यांना आहे.
हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतची लढाई आता रस्त्यावर सुध्दा लढणार
कोशारी यांनी दिल्ली दौरा देखील केला मात्र त्यांना बड्या नेत्यांच्या भेटी मिळाल्या नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता गुजरात निवडणूक झाली की याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
पालकांनो मुलांची काळजी घ्या, पुण्यात गोवरचे 5 रुग्ण, प्रशासन सतर्क
दहा ते चौदा महिन्यात १०० ते ११० टन उत्पादन, उसाच्या नवीन जातीचा लागला शोध
ब्रेकिंग! राज्यातील दोन जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी
Share your comments