डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ७ मार्च रोजी कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा परीक्षेचा मुख्य पेपरच्या अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ७ मार्च रोजी कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परीक्षा अंतर्गत कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. या अभ्यासक्रम बदल निर्णयाचा फेरविचार करावा व परीक्षेवर तात्पुरती स्तागिती आणावी
अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम ११ फेब्रुवारी रोजी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासक्रमात कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना प्राधान् देण्यात आले असून, कृषी अभियांत्रिकीसह इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमात अन्याय करण्यात आल्याचा आरोप आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी केला. पूर्वीचा अभ्यासक्रमात अभियांत्रिकी या पदवीला २८० गुणांचा अभ्यासक्रम देण्यात आलेला होता
मात्र आता तो कडून फक्त १६ गुणांवर आणून ठेवलेला आहे. हा कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत डावळण्याचा कट एमपीएससी आयोगाने रचला आहे असे आरोप विद्यार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहून कुलगुरूंनी आंदोलनामधी विद्यार्थी प्रतिनिधिंशी चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला व त्यांचे निवेदन स्वीकार केले,पण जेव्हा पर्यंत प्रशासनाकडून याबद्दल काही ठोस पाऊले उचलली जात नाही तेव्हा पर्यंत हे आंदोलन असचे सुरू ठेवणार असे विद्यार्थ्यांनी सांगितले
कृषी व अभियांत्रिकी पदवीला समान दर्जा असतानाही नवीन नियमानुसार अभियांत्रिकी पदवीधारकांवर अन्याय केला जात आहे. कृषी विभागातील ८०% योजना या कृषी अभियांत्रिकीशी संबंधित असून सुद्धा अभियांत्रिकी शिक्षणाला दय्यम दर्जा का देण्यात येत आहे
कृषी विभागातील ८०% योजना या कृषी अभियांत्रिकीशी संबंधित असून सुद्धा अभियांत्रिकी शिक्षणाला दय्यम दर्जा का देण्यात येत आहे याचे उत्तर एमपीएससी आयोगाने द्यावे असे विद्यार्थी म्हणत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाद्वारे नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आंदोलन मागे घेतले जाणार नाही वर जर लवकरात लवकर या वर काही कार्यवाही केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
पण जेव्हा पर्यंत प्रशासनाकडून याबद्दल काही ठोस पाऊले उचलली जात नाही तेव्हा पर्यंत हे आंदोलन असचे सुरू ठेवणार असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
Share your comments