सध्या अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील भागवत देशमुख गेल्या २५ ऑगस्ट पासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नाही. नुकतेच ते शिंदे गटात सहभागी झाले होते. ते अकोला उपशहर प्रमुख म्हणून काम करत होते.
आता या प्रकरणी तपास सुरु आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर मृतदेह कापसी तलावात फेकून देण्यात आला होता. पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापसी तलावात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, हा मृतदेह दोन दिवसांपासून पाण्यात असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.
ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. 29 ऑगस्ट रोजी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी पोलिसांना आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. यामुळे तपासाला वेग आला.
आता उद्धव ठाकरेसोबत मराठा ताकद! संभाजी ब्रिगेडनंतर आता मोठ्या संघटनेने दिला पाठिंबा..
त्यामुळे भागवत अजाबराव देशमुख अशी या युवकाची ओळख पटली. आता पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. भागवत देशमुख गेल्या २५ ऑगस्ट पासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता. आता यामागे काही राजकीय घडामोडी आहेत, का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण..
पोल्ट्रीत पुराचे पाणी शिरल्याने ८५०० कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला, चर्चांना उधाण..
Share your comments