गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने भारतीय शेतीत मोठे बदल बघायला मिळत आहेत. यामध्ये रासायनिक खतांचा वापर याचा देखील समावेश आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादनवाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू केला यामुळे सुरुवातीला निश्चितच शेतकरी बांधवांना अपेक्षित असे उत्पादन देखील मिळाले. उत्पादनाच्या लालसेपोटी शेतकरी राजा दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढवत राहिला.
यामुळे मात्र काळ्या आईची प्रकृती पूर्ण खालावली आहे. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी भरमसाठ प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खते किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरली जाणारी रासायनिक तणनाशके एवढेच नाही बुरशी रोगावर वापरली जाणारी बुरशीनाशके यामुळे शेत जमिनीचा पोत हा लक्षणीय खालावला असून हाच सिलसिला आगामी काही वर्ष चालू राहिला तर काळी आई नापिक होईल असा धोका आता वाटू लागला आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! वाडा तालुक्यात आयोजित होणार कोकणातलं पहिलं कृषी प्रदर्शन; नितीन गडकरी असणार उद्घाटक
Successful Farmer : फक्त पाच एकरात घेतले सुमारे 125 टन खरबूजचे उत्पादन
गेली वर्षानुवर्ष पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे आता उत्पादनात घट होत असल्याचे हळूहळू लक्षात येऊ लागले आहे. शेतीमध्ये काळाच्या ओघात मोठा बदल होत आहे. पूर्वी शेतीसाठी पारंपारिक साधनाचा वापर होत असे आता मात्र यांत्रिकीकरणाचा जमाना आल्याने सर्व शेतीची कामे यंत्राने होऊ लागली आहेत.
या यंत्रामागोमागचं भारतीय शेतीत उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात उत्पादनात वाढ झाली निश्चित नो डाउट पण आता मात्र उत्पादनवाढीच्या अनुषंगाने केलेला प्रयोगच उत्पादन हिरावून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यामुळे या गोष्टीवर आत्ताच विचार विनिमय होणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा तणनाशकांचा अनिर्बंध वापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. याचा परिणाम म्हणुन उत्पादनात घट होऊ लागली आहे.
पूर्वी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर होत असे. सेंद्रिय खत कंपोस्ट शेणखत इत्यादी खते उत्पादन वाढीसाठी शेतकरी बांधव वापरत असत. या खतांमुळे देखील उत्पादनात वाढ होत होती शिवाय यामुळे जमिनीचा पोत देखील खालावत नव्हता याउलट जमिनीचा पोत अजूनच भक्कम बनत होता. याशिवाय पूर्वी जैविक पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल मानवी आरोग्यासाठी देखील नवसंजीवनी होता.
जैविक पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल हा पूर्णपणे केमिकल विरहित असल्यामुळे मानवी आरोग्याला याच्या सेवनाने कुठला त्रास होत नव्हता याउलट मानवी आरोग्याला पोषक तत्वे अधिक प्रमाणात मिळत होती. मात्र आता सर्वत्र रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर होत असल्याने केमिकलद्वारे उत्पादित केलेला हा शेतमाल मानवी आरोग्यासाठी देखील मोठा घातक आहे याबाबत अनेक संशोधकांनी संशोधन देखील करून ठेवली आहेत.
मात्र असे असले तरी अजूनही रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरूच आहे. मात्र यालाही काही अपवाद आहेत देशात आता सेंद्रिय शेतीकडे मोठ्या आशेने बघितले जात आहे शासन दरबारी देखील अनेक उपाय योजना यासाठी आखल्या गेल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीसाठी कोट्याधीश रुपयांची मंजुरीदेखील आपण बघितली आहे. यामुळे हळूहळू का होईना पुन्हा एकदा शेतकरी राजा सेंद्रिय शेतीची कास धरेल आणि चांगले उत्पादन तसेच दर्जावान शेतमाल उत्पादित करेल यात तिळमात्रही शंका नाही.
Share your comments