अमरावती जिल्ह्यातून युरिया खताची तस्करी केल्याची घटना समोर आली. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातून मध्यप्रदेशात युरिया खताची तस्करी करण्यात येत होती. बेनोडा पोलिसांनी खताची तस्करी करणा-यांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी ट्रकसह सुमारे 45 किलो वजनाची 240 खतांची पोती जप्त केली आहेत. कृषी विभागानेदेखील या घटनेची दखल घेतली आहे. पोलिसांनीही कृषी विभागाच्या तक्रारीवरून ट्रक चालकाला अटक केली आहे.
राज्यात युरियाची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे या खताला बाजारात चांगला भाव मिळत आहे. यातूनच खतांच्या काळ्याबाजाराला सुरुवात झाली आहे.या संपूर्ण प्रकरणासाठी रामगोपाल कन्हैयालाल उरीया आठनेर या ट्रक चालकासह मलकापूर येथील अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बुलढाणातून खतांची रोखीने खरेदी करून मध्यप्रदेशात नेत होते. पोलिसांनी याबाबत जेव्हा त्यांच्यावर कारवाई केली तेव्हा चौकशीदरम्यान त्यांनी, युरिया खत मलकापूर येथून आणून मध्यप्रदेशात विक्रीला नेत असल्याचे कबूल केले.
पावसाने हजेरी लावल्यामुळे आता सगळीकडे बियाणे आणि खताचे नियोजन करण्याची लगबग सुरु झाली आहे. सध्या राज्यात खत बियाणांबाबत शेतकऱ्यांची बरीच लूट केली जात आहे. कधी बोगस बियाणे देऊन तर कधी अधिक दराने बियाणे विकून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. यात शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. ही लूट थांबावी यासाठी राज्य सरकार,व कृषी विभाग सज्ज झाले आहेत. आतापर्यंत बऱ्याच कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून त्यांच्यावर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करुन बियाणांची विक्री करणे तसेच बियाणे कंपनीने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.
राज्य सरकारची मोठी घोषणा; 'या' वन्य प्राण्यामुळे शेतातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
खत-बियाणांबाबत वाढती अनियमितता
कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. खरीब हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यातील खत-बियाणांबाबत अनियमितता आढळून आल्यामुळे या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची अनियमितता वाढू नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी अफवा पसरवली जात आहे तसेच तुटवडा निर्माण झाल्यास खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकेल असे चित्र निर्माण केले जात आहे. या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले...
बारामतीच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! आता 'कृषी-फळबागा पर्यटना'ला मिळणार चालना
Share your comments