राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही भागात पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्यांची कामे खोळंबली आहेत. मात्र भडगाव तालुक्यातील मेहंदळे भागात पावसाने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. वेळेत आणि भरघोस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना जणू जीवदानच मिळाले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा वापर करत कपाशीची लागवड केली आहे. मात्र आता या पिकांना खताची आवश्यकता आहे. यंदा रासायनिक खतांच्या किंमती कधी नव्हे ते अधिक वाढल्या आहेत. असं असलं तरी शेतकरी पिके जगवण्यासाठी धडपड करत आहेत.
या पेक्षा बिकट अवस्था म्हणजे पैसे देऊनही शेतकऱ्यांना हवी ती खते मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खतांसाठी शोधमोहीम सुरू झाली आहे. शिवाय एवढे कष्ट घेऊनही खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मात्र शून्य अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महिंदळे परिसरात तरारलेली कपाशी पिके खतांच्या प्रतीक्षेत आहेत. खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक मेळच बसत नाही. खतांबरोबर मजुरीचे दरही वाढले आहेत.
८ ते २ यावेळेत मजूर कामाला येतात. या वेळेचे शेतात फवारणीचे तीनशे रुपये आणि स्त्रियांचे पीक निंदणी करण्याचे दोनशे रुपये इतकी मजुरी द्यावी लागते.मागीलवर्षी पेक्षा यंदा खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. किंमती वाढल्या असल्या तरी शेतकऱ्यांना त्याची गरज आहे त्यामुळे तेवढ्या किंमतीतही ते खत घेण्यास तयार आहे मात्र पैसे देऊनही त्यांना हवे ते खत मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
नवनियुक्त मुख्यमंत्री शेती बाबत 'अॅक्शन मोड' मध्ये...
तसेच मिळाले तर ह्युमोलसारखे खत शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. तेव्हा त्यांना खत मिळते. त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती या सगळ्या परिस्थितीमुळे शेवटी शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नसल्याचे शेतकरी सांगतात.
त्यामुळे एकीकडे पावसाने साथ दिली तर खतांच्या किंमती वाढल्या. तर दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
महत्वाच्या बातम्या:
7th pay commission: कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 2 लाख रुपये दिले जाणार?
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..
Share your comments