आपन बाहेर अनेक चांगली नौकरी च्या शोधात असतो परंतु आपल्या जवळ शेती असुनही तीच्या कडे दुर्लक्षच करतो कारण आपण शेतीकडे एक संधी म्हणून बगतच नाही. चांगला नौकरी शोधण्यासाठी ज्याप्रमाने प्रयत्न करतो, जर शेती असलेल्यांनी थोडे प्रयत्न आपल्या शेतात काहीतरी नविन करण्यासाठी केले तर किती बर होईल ना... ज्यांच्याकडे शेती नाही तेही शेती घेऊन आपला उत्तम शेती व्यवसाय सुरु करू शकतात. अशा प्रकारे नव्या संधी म्हणून शेतीकडे बघू शकतो व शेतीला आधुनिकतेची जोड देवू शकतो. शेती करत असताना शेतीला पूरक जोडव्यवसाय करता येतील, त्यामध्ये अनेक व्यवसाय आहेत गांडुळ खत निर्मिती गांडूळ खतापासून गांडूळ तर मिळतातच,
खतही मिळतेच परंतु सेंद्रिय शेती करताना अजून एक महत्वाची गोष्ट यातून मिळते ती म्हणजे व्हर्मीवॉश. ज्याचा पिकांवर येणाऱ्या किड व रोगांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो. गायींचा गोठा ज्यातुन आपल्याला दूध, शेण, गोमूत्र मिळते. दूधापासून रोजचे आर्थिक उत्पादन मिळत राहते, तर शेणाचे अनेक उपयोग आहेत, सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेण व गोमूत्राचा उपयोग केला जातो. तसेच शेळीपालन, कुक्कुट पालन, रोपवाटिका, औषधी वनस्पती लागवड, बटेरपालन इत्यादी अनेक शेतीला जोडव्यवसाय सुुरू करता येतील. प्रत्येकाची परिस्थिती, परिसरातील वातावरण यावर आपला जोडव्यवसाय कुठला करावा हे अवलंबून आहे.
तसेच शेळीपालन, कुक्कुट पालन, रोपवाटिका, औषधी वनस्पती लागवड, बटेरपालन इत्यादी अनेक शेतीला जोडव्यवसाय सुुरू करता येतील. प्रत्येकाची परिस्थिती, परिसरातील वातावरण यावर आपला जोडव्यवसाय कुठला करावा हे अवलंबून आहे. याबरोबरच शेती करताना सुयोग्य नियोजन केल्यास चांगले शेती प्रकार देखील करता येतील. त्यामध्ये फळबाग, भाजीपाला, फुलशेती पैकी आपल्या शेतीच्या प्रकारानुसार आणि वातावरणानुसार वेगवेगळे प्रकार अवलंबू शकतो.
आपल्याला आवड असेल तर आपण त्यापासून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवू शकतो. उदा. पपई पासून जॅम, जेली, टुटीफ्रुटी, मुरंबा, पेपेन असे पदार्थ बनवले जातात.
असे वेगवेगळ्या फळांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यानुसार प्रक्रिया केलेल्या पदार्थांना मागणी तर चांगली असतेच, बाजारभावही चांगला मिळण्यास मदत होते.
Share your comments