राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा हिताचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे.
शेतीतील (Agriculture) नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान 23 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 15 सप्टेंबरपासून वाटप होणार असल्याची माहिती दिली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया केली आहे त्यांनाच या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
खुशखबर! कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात वाढणार 38% DA; जाणून घ्या थकबाकी आणि इतर माहिती
ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक केले नाही त्यांना हे अनुदान मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येईल. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे लागेल.
मोठी बातमी: राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती; या विभागात 78000 पदे भरणार
जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच तुमचे नाव या लाभार्थी यादीमध्ये येणार आहे. अन्यथा तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लिंकिंग प्रक्रिया करून घ्यावी. आणि शेतकऱ्यांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा.
भारतातून पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटो निर्यात केला जाणार; बाजारभाव वाढणार...
Share your comments