मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतजमिनीचे आणि पर्यायाने मानवाचेही आरोग्य बिघडत जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे यासाठी मोदी सरकारने काही निर्णय घेतले आहेत.
तसेच नैसर्गिक शेतीबरोबरच पारंपरिक देशी पध्दतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याकरिता केंद्राच्या माध्यमातून योजनाही राबवली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व कृत्रिम व रासायनिक खते वगळण्यावर भर देण्यात आला आहे. हे भविष्यात खूप घातक ठरणार आहे. यामुळे बायोमास मल्चिंग, शेण-मूत्र फॉर्म्युलेशनच्या वापरास प्रोत्साहन देण्यात आले आहे. यासाठी सरकार मदत देखील करणार आहे.
यामध्ये ३ वर्षासाठी हेक्टरी १२ हजार २०० रुपये मदत केली जाणार आहे. त्या अनुशंगाने देशभरात ४ लाख हेक्टरवर हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला जाणार आहे. केंद्र सरकारने भारतीय नैसर्गिक प्रणाली ही योजनाही सुरु केली असून यंदा देशात ४ लाख हेक्टर क्षेत्रफळावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला जाणार आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये देशभरातील ८ राज्यांसाठी ४९ कोटी ९९ लाख रुपये दिले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नैसर्गिक शेतीबरोबरच पारंपरिक देशी पध्दतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याकरिता केंद्राच्या माध्यमातून योजनाही राबवली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व कृत्रिम व रासायनिक खते वगळण्यावर भर देण्यात आला असून बायोमास मल्चिंग, शेण-मूत्र फॉर्म्युलेशनच्या वापरास प्रोत्साहन देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या;
'भीम शक्ती' मुळे शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन, आता कांदा साठवणुकीचा प्रश्न कायमचा मिटला..
ज्याची शेतकऱ्यांना भीती होती तेच झाले, आता लाखाचे होणार बारा हजार; केंद्राच्या निर्णयाने शेतकऱ्यांना धक्का
दुग्धव्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, मग नाही कसल्याही नोकरीची गरज
Share your comments