1. बातम्या

जमिनीएवढेच महत्त्व पाण्याच्या उत्पादकतेला, शेतकऱ्यांनो समजून घ्या..

जमिनीच्या उत्पादकतेएवढेच, किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भातून पाण्याकडे पाहावे लागेल. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन व्हायला हवे. लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धताही कमी होत जाणार आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
water land

water land

जमिनीच्या उत्पादकतेएवढेच, किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भातून पाण्याकडे पाहावे लागेल. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन व्हायला हवे. लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धताही कमी होत जाणार आहे. त्या अनुषंगाने पाणी उत्पादकतेसह, त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था, नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण आजपासून दर शुक्रवारी मालिकेच्या रूपाने संवाद साधणार आहोत. त्यातून पाण्याविषयीची जागरूकता वाढण्यास अधिक मदत होणार आहे.

पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा, हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहू, प्रत्येकाच्या वाट्याची जमीन कमी होत गेली. त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले. जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. शेतीमालाचे अनिश्चित बाजार भाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या पुढ्यात आहेत.

पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळे व बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी होत चालली आहे. लोकसंख्या यापुढेही वाढत राहणार आहे. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमीच होत जाणार आहे. सन १९४७ मध्ये धरण वा साठवलेल्या पाण्यातून १६ टक्के शहरी जनतेला पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा पुरवठा व्हायचा. आजमितीला ९६ टक्के शहरी लोकसंख्येबरोबरच ८५ % ग्रामीण जनतेला हा पुरवठा होतो आहे. तज्ज्ञांच्या मते सन २०३० पर्यंत वाढलेल्या लोकसंख्येमुळे आजच्या तुलनेत पाण्याची मागणी ४०-५० टक्क्यांनी वाढणार आहे.

त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या ५०-७० टक्के पाणी खेचणार आहेत. त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्यपणे कमीच होत जाणार आहे. यासाठीच उपलब्ध जमिनीत व कमीतकमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरते. कारण शेतीमालाचे बाजार भाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळेल. आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणारच आहे. यासाठी पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे.

26 किलोच्या माशाने मच्छिमार बनवला लखपती, या कारणाने माशाला लागली मोठी बोली..

अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त चारशे पीपीएम हवे. (पार्टिकल्स पर मिलियन म्हणजे एक लिटर पाण्यात चार ग्रॅम इतके प्रमाण). यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडते. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना गुदमरायला होते. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयचे शोषण यावर होतो.

याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रण ठेवण्याच्या यशस्वितेत! ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते. म्हणजेच पानांच्या श्वसनातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर. पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो हवेचे तापमान, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा एकूण वेळ यावर.

पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते झाडाची पाण्याची गरज. या सर्व शास्त्रीय बाबी समजून घेतल्या की ड्रॉप' व क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मितीचे आणि त्यावरून उत्पादकतेचे! पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज किती हे लक्षात येते.

हरभरा खरेदी न झाल्याने राज्यातील शेतकरी नाराज, नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी..

गेली तीन वर्षे पाऊस भरपूर पडत असला, तरी हेही लक्षात घेतले पाहीजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्षे येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असतानाच ते आवश्यक इतकेच वापरायची सवय लागणे गरजेचे आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने दोन प्रकारे मोजता येते.

महत्वाच्या बातम्या;
ऊस उत्पादनाचा आलेख वाढवला, एकरी ८५ टनांवरून ११३ टनांपर्यंत उत्पादन
शेतकऱ्यांनो दुग्ध व्यवसायातून पैसे कमावण्याची उत्तम संधी, नाबार्डकडून मिळतंय अनुदान
शिमला मिरचीने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, लाखोंचा नफा

English Summary: Farmers understand that water productivity is as important as land. Published on: 19 February 2023, 12:38 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters