चिखली तालुक्यातील सवणा येथील अंनथा चोपडे याने थायलंड देशातील फुकेट शहरात दि.3 ते 10 एप्रिल दरम्यान पार पडलेल्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बाँक्सिग स्पर्धेत सवणा येथील श्री चंदनशेष क्रीडा मंडळाचा खेळाडु अंनथा चोपडे याने 54 किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले.अंनथा ने भारतासाठी आतपर्यंत दोन सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे.सन 2019 मध्ये इंडोनेशियात पार पडलेल्या प्रेशीडेटं चषकातही 52 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे.
श्री चंदनशेष क्रीडा मंडळाचे सचिव तथा प्रशिक्षक कैलास करवंदे यांनी अंनथा आठ वर्षाचा असतांना त्याची शारीरिक क्षमता ओळखुन
त्याच्या कडुन महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी प्रवेशा साठी लागणारया चाचण्या ची तयारी करुन घेतली याच चाचणी च्या योग्यतेने त्याची क्रीडा प्रबोधिनि साठी वर्ग तिसरी मध्ये असतांना त्याची क्रीडा प्रबोधिनी साठी निवड झाली.हाच अंनथा साठी मौलाचा क्षण ठरला व त्याचे त्याने सोने केले.
गडचिरोली क्रीडा प्रबोधिनीतील त्याच्या तंदुरुस्त शिबिरात त्याच्या शारीरिक क्षमते नुसार त्याने बाँक्सिग येळ निवडुन अकोला येथील क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षक डॉ सतिशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य,राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या असुन आता आँलम्पिक च्या उंबरठ्यावर आहे.
सन 2024 च्या पँरीस आँलम्पिक साठी महाराष्ट्राचा स्टार बाँक्सर अंनथा हा भारतीय बाँक्सिग संघात नक्कीच असेल अशी अपेक्षा आहे.अशा अनेक स्पर्धेतील उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल सन 2020 फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्याला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच तो भारतीय रेल्वेत टि.सि या पदावर कार्यरत आहे.
अतिशय गरीब शेतमजूर कुटुंबातीला बाँक्सर अंनथा चोपडे आंतर राष्ट्रीय स्तरावर देशाला सुवर्ण पदक मिळवुन देतो ही बाब ग्रामीण भागातील खेळाडु साठी अतिशय प्रेरणादायी आहे.
कठीण परीस्थितीतुन पुढे येत तो सातत्याने बाँक्सिग या खेळासाठी उल्लेखनीय कामगीरी करत आहे.सध्या तो पंजाब स्थित पटीयाला येथे बाँक्सिग शिबिरात सराव करत आहे.आजही तो गावाकडे आला असता चंदनशेष क्रीडा मैदावर येउन त्याचे पहिले प्रशिक्षक कैलास कंरवंदे यांचे मार्गदर्शन घेत असतो.त्याच्या या कामगिरी बद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्याच्या या अतुलनीय कामगिरी बंदल ज्या श्री चंदनशेष क्रीडा मंडळाच्या मैदानावरुन त्याची सुरुवात झाली त्या क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पदमाकर भुतेकर, सचिव कैलास कंरवंदे,उपाध्यक्ष सुभाष हाडे,विश्वास भुतेकर, सौ रंजना सुभाष विर,विजय भुतेकर,राजेंद्र भुतेकर,शे हमीद,किशोर हाडे,ज्ञानेश्वर कंरवंदे, सुनिल पवार,यांनी अंनथा चोपडे याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडीलाचा सत्कार केला व अंनथा चोपडे यास शुभेच्छा देत अभिनंदन केले जात आहे.
संकलन - विजय भुतेकर
सावणा
Share your comments