शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या फळपिकांच्या वाणांचाच वापर करावा

Monday, 02 September 2019 07:21 AM


मुंबई:
सिताफळ व सर्व फळपिकांकरिता कृषी विद्यापिठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

शेतकरी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. तथापि सुरुवातीच्या तीन ते पाच वर्षाच्या फळधारणापूर्व कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत काहीही सांगता येत नसल्याने कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधून कृषी विद्यापीठांनी शिफारस न केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करु नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. 

Agriculture Department Governmant of Maharashtara कृषी विभाग सीताफळ Custard apple कृषी विद्यापीठ Agricultural Universities

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.