शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. असे असताना सरकार शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हून अनेक योजना राबवत असते. शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत मजबूत व्हावे, हा यामागचा हेतू असतो. आपल्या देशातील मोठ्या प्रमाणावर लोक शेती व्यवसायाशी संबंधित आहेत. अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे. भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. यामुळे यावर अनेक घटक अवलंबून आहेत.
देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे विविध योजना राबवतात. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना कमी किमतीत खत, खते इत्यादी आर्थिक आणि शेती संबंधित उपकरणे, वस्तूही पुरवल्या जातात. याशिवाय सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देखील लागू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.
आता शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर सुमारे 50 ते 80 टक्के सवलत मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तुम्हालाही या सवलतीचा फायदा घेता येऊ शकतो. या योजनेचे नाव 'स्माम' योजना असून याद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, वास्तव्याचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा,बँक पासबुक,मोबाइल क्रमांक, जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करून या ठिकाणी Registration हा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी (फार्मर) हा पर्याय निवडावा लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यास एक पेज सुरू होईल. त्यावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर नाव, आधार क्रमांक नमूद करा. त्यानंतर तुम्हाला अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागणार. सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
तसेच कोणत्याही शेतकऱ्याला या स्माम योजनेचा लाभ मिळू शकतो. यामध्ये केंद्र सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के अनुदान देते. शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देते. यामुळे शेतकऱ्यानो या योजनेचा फायदा घ्या.
महत्वाच्या बातम्या;
उन्हाळी आवर्तनाबाबत कालवा समितीचा निर्णय; इंदापूर, बारामती, फलटण, खंडाळा, पंढरपूरमधील शेतकऱ्यांना दोन आवर्तने
आता मोदी सरकारच्या 'या' योजनेत शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार २०० रुपये, जाणून घ्या..
'भीम शक्ती' मुळे शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन, आता कांदा साठवणुकीचा प्रश्न कायमचा मिटला..
Share your comments