मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी बर्फ दृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या पावसामुळे राज्यात थंडीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार खान्देश, विदर्भ या भागात गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात अनेक भागात मागील काही दिवसापासून जोरदार पावसासह गारपीटीने हजेरी लावली आहे.
थंडीच्या दिवसात पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 आणि 22 जानेवारीला तुरळक ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खराब वातावरणामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. आता आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. गहू, कांदा, हरभरा आणि फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे. या खराब वातावरणामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आहे. कांदा पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.
Share your comments