डीएपी.
डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून मळावे. मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे असली डीएपी आहे. अथवा डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन त्यावर टाकावे. जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी असली किंवा खरे आहे.
युरिया.
युरियाचे दाणे पाण्यात टाकल्यानंतर तर ते पाण्यात विरघळतात आणि हाताला पाणी थंड लागत असेल तर युरिया असली असल्याचे समजावे. अथवा काही दाणे गरम तव्यावर टाकावे, आच वाढवल्यानंतर हे दाणे नाहिसे झाल्यास हे हा ओरिजनल किंवा उकृष्ट युरिया आहे.
पोटॉश.
काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर जर दाणे एकमेकांना चिटकत असतील तर तर त्यात काही तरी बनावटपणा असल्याचे समजावे आणि पाण्यात टाकल्यानंतर पोटॉश विरघळत असते, पाण्याच्या वरच्या भागात लाल रंग दिसत असतो.
सुपर फास्फेट.
सुपर फास्फेटचे दाणे जाड आणि बदाणी रंगाचे असतात. सुपर फास्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर याचे दाणे ही फुलले किंवा फुटले नाही तर समाजावे की, यात कोणताच बनावटपणा नाही. सुपर फास्फेटचे दाणे कठिण असतात, नाखांनी हे दाणे तुटत नाहीत.
मध आरोग्यासाठी आहे खूपच भारी, पण त्याची शुद्धता अशा प्रकारे तपास..
जिंक सल्फेट...
जिंक सल्फेटचे दाणे हे सफेज तसेच भुरक्या रंगाचे बारीक असतात. जिंक सल्फेटमध्ये मॅग्नीशिअम सल्फेटची भेसळ केली जाते. दोन्ही खते एकसारखी दिसत असल्याने दोघांचा फरक करणे सोपे नसते.
महत्वाच्या बातम्या;
गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेत्याने केली जोरदार टीका..
शेतकऱ्यांनो 'या' पद्धतीने पेरूची लागवड करा, कमी वेळात जास्त उत्पन्न मिळेल
मत्स्यशेतीने नशीब पालटले, वर्षाला कमवतोय २ कोटी..
Share your comments