सध्या मान्सून आपल्याकडे दाखल झाला असून शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करत आहेत. असे असताना सुरुवातीला धमाकेदार सुरुवात केल्यानंतर आता मात्र पाऊस काहीसा गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. २९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. यावेळीही मान्सूनने दहा दिवसांचा ब्रेक घेतला. यामुळे दुष्काळ पडणार की काय अशी चिंता सगळ्यांना सतावत आहे.
हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून शुक्रवारी वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत शनिवारी मान्सून मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाला. असे असताना मात्र रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस बेपत्ता झाला असून, मुंबईत तर कडाक्याच्या उन्हामुळे उष्णता वाढत आहे. यामुळे आता पाऊस नेमका कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मान्सून थांबल्यामुळे शेतकऱ्यांनाही पेरणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ४८ तासांत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र याबाबत अजूनही शक्यता कमीच आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
आता शरद पवार होणार राष्ट्रपती?? सोनिया गांधींनी तयार केला प्लॅन..
दरम्यान, शेतकऱ्यांची पेरणीची सगळी तयारी झाली असून शेतकरी फक्त पावसाची वाट बघत आहेत. यामुळे आता पाऊस कधी पडणार याकडेच शेतकरी राजाचे लक्ष लागले आहे. अनेकांनी बियाणे खते देखील खरेदी केली आहेत. कृषी विभागाने यावर्षी चांगली तयारी केली असून शेतकऱ्याची फसवणूक करणारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजरी पिकाचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार
सिंचन उपकरणांमुळे पाणी आणि पैसा दोन्हीची बचत होणार, शासनाकडून 90% अनुदान
तरुणांनो नोकरीत पैसे मिळत नसतील तर सुरु करा अॅग्रीकल्चर स्टार्टअप, सरकार देणार २५ लाख रुपये
Share your comments