इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. इंदापूर तालुक्यातून खडकवासला कालव्याचे आवर्तन जाऊन आता 25 दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे पिके व गावांच्या पाणी योजना केवळ कालव्यावर अवलंबून असल्याने अनेक गावांच्या पाणी योजना व शेतातील पिके धोक्यात आली आहेत.
यामुळे शेतकरी पाण्याची मागणी करत आहेत. सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे ते तरंगवाडीपर्यंत अनेक गावांच्या पाणी योजना व हजारो एकर क्षेत्र कालव्यावर अवलंबून आहे.
गतवर्षी धरणांची परिस्थिती चांगली असल्याने शेतकर्यांनी उन्हाळी आवर्तने वेळेत येतील, या आशेवर पिके केली आहेत. एप्रिल महिन्यात कालव्याला पाणी येईल का नाही? हे सध्यातरी अस्पष्ट असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मुंबई डेंजर झोनमध्ये, महाराष्ट्रात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू..
अनेकांच्या विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पिके कशी जगवायची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खडकवासला प्रकल्पात सुमारे 13 टीएमसी अर्थात 47 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला कालव्यातून शेतीसिंचनासाठी उन्हाळी हंगामात आणखी दोन आवर्तने देणे गरजेचे आहे.
अशातच सध्या उन्हाची तीव-ता वाढत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडले आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतीसिंचन करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतीसिंचनासाठी खडकवासला कालव्यातून एप्रिल व मे अशा दोन्ही महिन्यांत प्रत्येकी एक आवर्तन जलसंपदा विभागाने सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
पोल्ट्री मधल्या तब्बल 13 हजार कोंबड्या अवकाळीच्या फेऱ्यात मृत्यूमुखी, क्षणात झालं होत्याच नव्हतं..
जलसंपदा विभाग उन्हाळ्यात केवळ एप्रिल व मे महिना मिळून एकच आवर्तन सोडते. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक राहतो. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदीत पाणी सोडावे लागते. ते पाणी वाया जाते. त्यामुळे उरलेल्या एप्रिल व मे या दोन महिन्यांचा कालावधी इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या हितासाठी जलसंपदा विभागाने यापुढील काळात दोन आवर्तने सोडणे गरजेचे आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता शेतकरी मुलाशी लग्न केल्यास 2 लाख रुपये मिळणार...
या पिकाचे तेल 20 हजार रुपये प्रति लिटर, दर चार महिन्यांत 1 लाखाची कमाई..
कांद्याच्या अनुदानासाठी बनावट पावत्या, कारवाईची शेतकऱ्यांची मागणी...
Share your comments