मातीचा नमुना शक्यतो खरीप किंवा रब्बी पिकाच्या काढणीनंतर जमीन नांगरणी करण्याआधी आणि कोरडी असताना घ्यावा. त्याचा माती परीक्षण अहवाल पुढील हंगामातील पेरणीपूर्वी उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण त्यानुसार खतांचा नियोजन करणे सोपे जाते. प्रयोगशाळेत नमुना दिल्यानंतर साधारणपणे अहवाल प्राप्त होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. तो गृहीत धरून मातीचा नमुना प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवावा.
या प्रयोगशाळा जवळचे कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र येथे उपलब्ध असतील. या ठिकाणी माफक शुल्कामध्ये माती परिक्षण करून अहवाल मिळतो. काही शहरामध्ये खासगी प्रयोगशाळाही आहेत. परिक्षणाचा अहवाल हा तेथील शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावा. विशेषतः पुढील पीकनिहाय योग्य त्या खत नियोजनाची माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. माती परीक्षण अहवालाची वैधता साधारणत: २ ते ३ वर्षांपर्यंत असते.
ओलिताची सोय असलेल्या शेतात वर्षातून २ किंवा जास्त हंगामात पिके घेतली जातात. अशा शेताचे माती परीक्षण दर २ वर्षांनी करावे. वर्षातून केवळ एकच हंगामात पीक घेत असलेल्या शेतासाठी दर ३ वर्षांनी माती परीक्षण करावे. विविध पिकांच्या खत नियोजनाच्या दृष्टीने मातीचे आरोग्य तपासणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार शेतातून मातीचा नमुना घेण्याची पद्धत अवलंबावी लागते. मातीचा नमुना नेमका व अचूकपणे कसा घ्यावा, याची लेखामध्ये माहिती घेऊ.
मोदी सरकार २ हजार रुपये परत घेणार, शेतकऱ्यांकडून 100 कोटी वसूल करणार
माती परीक्षण आपण नेमक्या कोणत्या उद्देशाने करणार आहोत, हे माहिती असले पाहिजे. कारण त्यानुसार शेतातून मातीचा नमुना घेण्याची पद्धत अवलंबावी लागते. शेतामधील माती साधारणतः खालील तीन उद्देशांसाठी तपासली जाते. विविध हंगामी पिकांच्या खत नियोजनाच्या दृष्टीने मातीचे आरोग्य तपासणे. उदा. अन्नधान्य, आणि फुल पिके इ.
शेतकऱ्यांनो हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? जाणून घ्या..
२) विविध बहुवर्षायू फळपिकांचे खत नियोजन भाजीपाला करण्यासाठी. उदा. संत्रा, लिंबू, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, चिकू इ.
३) नव्या किंवा विशिष्ट फळबागेच्या लागवडीसाठी जमिनीची योग्यता तपासणे.
जिवामृत म्हणजे काय? जिवामृताच्या फवारणीचा परिणाम, शेतकऱ्यांनो जाणून घ्या..
विषमुक्त शेती व पशु विषयक उत्पादनांचा लोकप्रिय ब्रँड - इरिच इंडिया...
शेतीबद्दल सकारात्मक विचार गरजेचा
Share your comments