1. कृषीपीडिया

शेतीबद्दल सकारात्मक विचार गरजेचा

आरोग्यदायक अन्ननिर्मितीसाठी माती व सेंद्रिय पीक उत्पादनाचा उपयोग होणे गरजेचे आहे. वर्तमानात शेती या क्षेत्रात रसायनांचा जोरदार वापर व त्याचा आरोग्यावर होणार परिणाम हा काही लपून राहिलेला नाही. गरज आहे आज सेंद्रिय शेतीकडे वळण्याची. आता सेंद्रिय शेती म्हंटली, की आपल्याला डोळ्यासमोर रासायनिक खते व रासायनिक कीटनाशके न वापरता केलेली शेती येईल. आता मुद्दा समजून घेऊ अति सेंद्रिय किंवा ‘अति रासायनिक’ शेती हे दोन्ही आपल्या साठी घातकच ठरेल.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmar farm

farmar farm

आरोग्यदायक अन्ननिर्मितीसाठी माती व सेंद्रिय पीक उत्पादनाचा उपयोग होणे गरजेचे आहे. वर्तमानात शेती या क्षेत्रात रसायनांचा जोरदार वापर व त्याचा आरोग्यावर होणार परिणाम हा काही लपून राहिलेला नाही. गरज आहे आज सेंद्रिय शेतीकडे वळण्याची. आता सेंद्रिय शेती म्हंटली, की आपल्याला डोळ्यासमोर रासायनिक खते व रासायनिक कीटनाशके न वापरता केलेली शेती येईल. आता मुद्दा समजून घेऊ अति सेंद्रिय किंवा ‘अति रासायनिक’ शेती हे दोन्ही आपल्या साठी घातकच ठरेल.

त्यांचे कारण समजुन घेणे महत्त्वाचे आहे.जर आपल्या शेती शेजारी शेतकरी रासायनिक शेती करत असेल व आपन सेंद्रिय शेती ची वाटचाल असेल तर आपल्या सेंद्रिय शेती ला काही अर्थ नाही. त्या शेतकऱ्याच्या शेतातले हवेच्या वाटे येणारे केमिकल चे फवारणी व पाण्याच्या वाटे केमिकल युक्त खते हे वाहत आपल्या शेतात जर आले तर आपन खरंच सेंद्रिय शेती कशी करु शकतो.हे तर नैसर्गिक गोष्टी आहे.प्रथम आपल्याला निसर्गाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. हवा पाणी याला हे याला अपवाद नाही.

मित्रांनो काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती करतांना काही तत्त्वे आपण जोपासली पाहिजे. मुख्य म्हणजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिलेले आहे, म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणे महत्त्वाचे आहे.
शेतीमधील आशादायक चित्र बघायचे असेल तर तरुणवर्ग शेतीकडे वळने महत्वाचं आहे.

त्याच बरोबर शेती चे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून भविष्यात शेती साठी नवीन बदलांव स्वीकारणे गरजेचे आहे. तसेच शेतीपूरक व्यवसायातही गुंतवणूक करणे आवश्यक आहे ते व्यवसाय शेती घ्या संदर्भात असो किंवा नसो काही फरक पडत नाही.आपली व्यवसाय मधली आवक येणे आवश्यक आहे.

बैलगाडीतून आले लग्नाचे वऱ्हाड, पारंपरिक विवाह सोहळ्याची रंगली चर्चा

क्षेत्र कोणतेही असो शेतीचे का असो त्या कामाची लाज वाटली नाहीपाहिजे. आपल्या क्षेत्रात मोठें होणे गरजेचे आहे आपल्या जगण्याचा मूलाधार असलेल्या शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील, तेव्हा करिअरचे क्षेत्र निवडताना कृषी क्षेत्राचा प्राधान्याने विचार व्हायला हवं आहे.

धोनी झाला शेतकरी, तब्बल दोन वर्षांनी पोस्ट करत सर्वांनाच दिला धक्का

शेती क्षेत्र हे संपत्ती आणि बुद्धी प्रदान करते. आणि शेती हा मानवी जीवनाचा आधार आहे. म्हणूनच जो विषय इतका प्राचीन, जुना आहे, शेती या विषयामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवन पद्धती यांनी संपूर्ण विश्वाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या हातात आला पाहिजे, हे आपल्याकडे होत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचणं आवश्यक आहे.

मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
9423361185
9403082042

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? जाणून घ्या..
गहू काढणीसाठी 'हे' छोटे कृषी यंत्र ठरतंय खूपच फायद्याचं, वेळ आणि पैसाही वाचतोय
नियोजन उन्हाळी भुईमूग हंगामाचे

English Summary: Positive thinking about agriculture is necessary Published on: 13 February 2023, 10:29 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters