अनेकदा आपण बघतो की शेतकऱ्यांना कांदा हा रडवतो, तर काहीवेळेस मालामाल करत असतो. असे असताना आता कांद्याचे दर हे पडलेले दिसून येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या कांद्याला 2 ते 3 रुपये किलो असा दर आहे. यामुळे तो फुकटात विकला तरी सारखेच असल्याचे एका शेतकऱ्याने म्हटले आहे. आणि यामुळे या शेतकऱ्याने फुकटात कांदा विकला आहे.
शेगावच्या गणेश पिंपळे यांनी कांदा फुकटात वाटला आहे. यामुळे सध्या या शेतकऱ्याची चर्चा सुरु आहे. ग्राहकांसाठी असा अवलिया समोर आल्याने सगळे अवाक झाले आहेत. गणेश पिंपळे यांनी 2 एकरामध्ये कांदा लागवड केली होती. यासाठी त्यांनी २ लाख खर्च केले होते. मात्र विक्रीच्या दरम्यान कांद्याचे असे काय दर घसरले की, बाजारपेठेपर्यंतची वाहतूकीचा खर्च निघत नव्हता.
यामुळे गोर-गरिबांना तरी कांदा फुकटात मिळेल या उद्देशाने त्यांनी शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात मोफत कांदा वाटप केले. मोफत कांदे देत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. जागोजागी रचलेले कांद्याचे ढिगारे अवघ्या काही वेळात रिकामे झाले. कवडीमोल दराने त्रस्त झालेल्या गणेशराव यांनी जेव्हा कांदे फुकटात ही घोषणा करताच अवघ्या काही मिनिटांमध्ये कांद्याचे ढिगारे गायब झाले.
कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कामासाठी गणेश पिंपळे यांनी कर्ज काढले होते. यामुळे आता त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचे हे चित्र बघून सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजारपेठेत मागणी नाही आणि घरात साठवणूकीची व्यवस्था नाही. यामुळे गणेश पिंपळे यांनी कांदा फुकटात वाटू पण घरी घेऊन जायचा नाही, असे त्यांनी ठरवले होते.
महत्वाच्या बातम्या;
गोड उसाची कडू कहाणी! एकीकडे ऊस तोडला म्हणून मिरवणूक तर दुसरीकडे गळ्याला फास
गोड बातमी : बंद पडलेल्या 11 साखर कारखान्यांना आता मिळणार नवसंजीवनी
राकेश टिकैत यांचे भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टीचे खरे कारण आले समोर..
Share your comments