शेती म्हटलं की सर्वात आधी गरज लागते ती म्हणजे पाण्याची. पाणी नसेल तरी शेतीमध्ये काहीही करता येत नाही. जमीन कसलीही कसेल तरी ती नीट करता येते मात्र पाण्याची सोय असणे खूप गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. असे असताना आता शेततळ्यासाठी सरकारकडून अनुदान देखील देण्यात येत आहे. यामुळे उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज यामुळे भागणार आहे.
शेततळे अनुदान योजना अंतर्गत अशावेळी शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतात शेततळे केले तर नक्कीच त्यांना याचा फायदा होऊ शकतो. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये शेततळी खोदून ठेवलेले आहेत त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना अद्याप कोणतेही अनुदान मिळालेले नाही.यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आता याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पाठपुरवा केल्यामुळे आता शेततळ्यांसाठी ५२ हजार कोटींचे अनुदान मिळणार आहेत. विहिरीपेक्षा शेततळे असणे केंव्हाही फायद्याचे आहे कारण त्यामध्ये पाणी साठवून ठेवता येते आणि हवे तेंव्हा ते शेतातील पिकांसाठी देता येते. तसेच याचा खर्च जवळपास सारखाच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा अंदाज घेऊनच काम करणे गरजेचे आहे.
शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगलवर mahadbt farmer login करावे लागेल. तुम्हाला महा डीबीटी शेतकरी पोर्टल दिसेल त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. लॉगीन केल्यावर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील त्यापैकी सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.
शेततळ्याबाबत योग्य माहिती निवडा. माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. ज्या योजना निवडलेल्या आहेत त्या योजनांना प्राधान्य द्या.अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.तुम्ही नवीन असाल तर make payment असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून पेमेंट करा. अर्जाची स्थिती व पोच पावती डाउनलोड करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी तुमच्या अर्जाची पोच पावती डाउनलोड करू शकता. अशाप्रकारे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या;
'नुकसान झालेल्या उसाला प्रती टन पाचशे रुपयांची भरपाई द्यावी'
गायींना गाणी ऐकवली तर तब्बल ५ लिटर दूध जास्त देतात, तरुणाने विडिओ बनवून केले सिद्ध
कलिंगड लाल आणि चवीला गोड ओळखावे कसे? वाचा सोप्पी पद्धत..
Share your comments