आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जी बैठक त्यामध्ये केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवायचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला याचा फायदा व्हावा म्हणून इथेनॉल च्या किमती मध्ये २.५५ रुपये प्रति लिटर ने वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे उसावर आधारित इथेनॉलची किमंत ६२.६५ रुपये वरून ६३.४५ रुपये होणार आहे. १ डिसेंम्बर २०२१ पासून हे नवीन दर लागू होतील अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिलेली आहे.
इथेनॉलच्या कोणत्या श्रेणीसाठी नवीन किंमती काय असतील:-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की बी श्रेणी च्या सेरामधून मिळणाऱ्या इथेनॉल च्या किंमती मध्ये वाढ होऊन ती आता ५७.६१ वरून ५९.०८ रुपये वर गेली आहे. सी श्रेणी च्या सेरामधून मिळणाऱ्या इथेनॉल च्या किंमती मध्ये वाढ होऊन ती आता ४४.५४ वरून ४६.६६ रुपये वर गेली आहे. यामागे ऑक्टोम्बर च्या २०२० मध्ये केंद्र सरकारने इथेनॉल च्या किंमतीत प्रति लिटर ३.३४ रुपये ने वाढ केली होती.
12 राज्यांतील शेतकऱ्यांना थेट फायदा:-
इथेनॉल च्या किमतीत वाढ झाल्याने याचा थेट फायदा देशातील १२ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की हे नवीन दर डिसेंम्बर २०२१ पासून सुरू होतील. सरकारने कच्या तेलाची आयात कमी करणे नियोजन केले आहे. सरकारने १० टक्के इथेनॉल मिश्रण ला परवानगी दिलेली आहे.इथेनॉल च्या किमतीत वाढ होऊन याचा फायदा शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल असे केंद्र सरकार म्हणले आहे.सरकारने २०१९ पासून जिथे 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल भाग आहेत त्या ठिकाणी इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम चालू केला आहे. मात्र अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये अजूनही या प्रोग्रॅम चालू केला नाही.
Share your comments