भारत एक कृषीप्रधान देश आहे यामुळे देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवरच अवलंबून आहे. भारताच्या जीडीपी मध्ये शेतीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. देशातील एकूण 130 कोटिहून अधिक जनसंख्या आहे आणि यापैकी निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्राशी संबंधित आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
यामुळे आज आपण भारतातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न नेमके किती आहे याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन अहवालानुसार (NSSO) शेतकरी कुटुंबाच्या मासिक उत्पन्नाच्या 29 राज्यांच्या तक्त्यानुसार महाराष्ट्र 11492 सह 16व्या स्थानावर आहे.
एक नंबर मेघालंय राज्य विराजमान असून या राज्याचे 29,348 प्रति कुटुंब एवढे उत्पन्न आहे. निश्चितच मेघालय राज्यातील शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न हे देशातील इतर शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नापेक्षा खूप अधिक आहे. कृषी कुटुंबांच्या उत्पन्नावरील अंतिम उपलब्ध अंदाज NSSO द्वारे 77 व्या फेरीतील अर्थात जानेवारी-डिसेंबर 2019 केलेल्या कृषी कुटुंबांच्या स्थिती मूल्यांकन सर्वेक्षणावर आधारित आहेत.
महत्वाच्या बातम्या
Pm Kisan : ई-केवायसी केली नाही तरी मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; काय सांगितलं सरकारने
सर्वेक्षणानुसार, सर्व स्त्रोतांकडून प्राप्त झालेले प्रति कृषी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न रु. 10,218/- असण्याचा अंदाज आहे. भारतातील सर्वाधिक मासिक शेतकरी उत्पन्न असलेली शीर्ष पाच राज्ये पुढीलप्रमाणे : मेघालय (1), पंजाब (2), हरियाणा (3), अरुणाचल प्रदेश (4), त्यानंतर जम्मू आणि काश्मीर (5). या शीर्ष 5 राज्यांचे सरासरी मासिक उत्पन्न 23,406 रुपये आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड ही शेवटची 5 राज्ये आहेत ज्यांचे मासिक कुटुंब उत्पन्न 6,474 रुपये आहे.
जर आपण वरच्या राज्याची (मेघालय) शेवटच्या राज्याशी (झारखंड) तुलना केली, तर मेघालयचे मासिक उत्पन्न झारखंडच्या मासिक उत्पन्नाच्या जवळपास 6 पट अधिक आहे. उत्पन्नातील तफावतीची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये अल्प जमीन असलेले शेतकरी, कमी उत्पन्न, वर्षानुवर्षे एकाच पिकाची लागवड, किमान आधारभूत किमतीची खरेदी न करणे, पीक वैविध्यता ही उल्लेखनीय आहेत.
2014 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. पण एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार गंतव्य अजून दूर आहे. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, गेल्या तीन वर्षात, संपूर्ण अर्थव्यवस्थेतील कृषी आणि संलग्न क्षेत्राचा एकूण मूल्यवर्धित (GVA) वाटा सातत्याने वाढला असून, कोरोना महामारी, लॉकडाऊनच्या दुष्परिणामांना मागे टाकत पुढे सरासावत आहे.
2018-19 मध्ये हा वाटा 17.6 टक्क्यांनी वाढला तर 2020-21 मध्ये 20.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. मात्र उत्पन्नामध्ये वाटा वाढलेला नाही. एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न 11 हजार 492 रुपये असून भारतातील शेतकरी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न 10 हजार 218 रुपये एवढ आहे. यामुळे यामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments