येवला तालुका मध्ये दांडी मारलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा आपली हजेरी लावलेली आहे यामध्ये उत्तर पूर्व भागातील तसेच पश्चिम भागातील शेतकरी पिकांवर खतांचा डोस देत आहेत परंतु या मान्सून मध्ये युरिया ची टंचाही भासत आहे त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत.
येवला तालुक्यामध्ये पेरणीचा अंतिम टप्पा चालू असून तिथल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, मूग, तूर या पिकांची पेरणी केली आहे. पेरणी केलेल्या पिकांना आता खताची गरज भासू लागली आहे त्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे त्यात युरिया ची टंचाई लाभत असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.सोयाबीन, बाजरी, कापूस या पिकांना ज्यावेळी रासायनिक खते द्यायची असतात त्याच वेळी त्यांना युरिया सुद्धा द्यावा लागतो यासाठी शेतकरी वेगवेगळ्या दुकानदार लोकांकडे फिरत आहेत.
हेही वाचा:बाप रे! या शेतकऱ्याने घराच्या छतावर केली रंगीबेरंगी कणसांची शेती
युरिया पाहिजे असेल तर इतर खाते सुद्धा घ्यावी लागतील असे दुकानदार सक्ती करत आहेत त्यामुळे युरिया खत मिळवणे शेतकऱ्यांना खूप मुश्किलीचे झाले आहे. शेतकरी दुकानदारांच्या हातापायी पडत आहेत. काही कंपन्यांचे बाजारात युरिया खत उपलब्ध आहे मात्र दुकानदार लोक खताबरोबर इतर खते घेण्यास भाग पाडत आहेत.दरवर्षी पावसाळ्यात खरीप हंगामावेळी खतांच्या किमती वाढलेल्या असतात त्यामध्ये युरीया खताचे डोस जर पिकांना योग्य वेळी मिळाले नाहीत तर त्या पिकाची वाढ होत नाही ती पिके खुंटली जातात आणि हीच भीती अत्ता शेतकऱ्यांच्या मनामध्ये दाटलेली आहे.
या परिस्थितीत शेतकरी कृषी दुकानदारांना कितीही पैसे घ्या पण युरिया खते द्या असे म्हणत आहेत यावरून आपल्याला असे दिसते की कृषी दुकानदार शेतकऱ्यांची मानसिक तशीच आर्थिक पिळवणूक करत आहेत.येवला तालुक्यामधील दुकानदार शेतकऱ्यांना सांगत आहेत की जर युरिया ची गोन पाहिजे असेल तर आधी खताची गोन सुद्धा घ्यावी लागेल अशा सक्तीमुळे दुकानदार करत आहेत. युरिया च्या गोणी शिल्लक असूनही दुकानदार असे करत आहेत त्यामुळे सरकारने यावरती लक्ष देऊन शेतकऱ्यांवर होणार अन्याय रोकला पाहिजे.
Share your comments