1. बातम्या

बाप रे! या शेतकऱ्याने घराच्या छतावर केली रंगीबेरंगी कणसांची शेती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
maize

maize

पावसाळा आला की मार्केट मध्ये आपल्याला सर्वत्र मक्याची कणसे दिसतात तसेच प्रत्येकाच्या घरी आपल्याला मक्याच्या दाण्यापासून वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या दिसतात. सोशल मेडियावर पाहायला गेले तर आपल्याला पिवळ्या रंगाची कणसे सोडून अनेक वेगळ्या वेगळ्या रंगाची कणसे पाहायला भेटत आहे.

जे सांगणार आहोत त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण एका शेतकऱ्याने त्याच्या छतावर पिवळ्या रंगाची नाही तर दुसरी रंगाची कणसे उगवली आहेत जे की खायला सुद्धा एकदम चविष्ट आणि दिसायला सुद्धा खूप रंगीबेरंगी आहेत.या मक्याच्या दाण्यांना रंगीबेरंगी रेनबो कॉर्न असे म्हणतात. या प्रकारचे कणीस सगळ्यात आधी थायलंड मध्ये दिसले.केरळमधील मल्लापुरममध्ये अब्दुल रशीद नावाचा शेतकरी राहतो त्याने त्याच्या घराच्या छतावर रंगबेरंगी दाण्याचे पीक घेतले आहे त्यामध्ये त्याला चांगले यश मिळाले, त्याने त्याच्या छतावर रेनबो कॉर्न मक्याचे कणीस उगवले आहे.

मक्याच्या कणसावर इंद्रधनुष्याप्रमाणे छटा आहेत. हे रंगीबेरंगी कणीस तुम्ही पाहिले तर तर त्याच्या वरची साल साध्या मक्याच्या कणसाप्रमाणे   दिसते. जेव्हा तुम्ही त्या कनसाची साल काढता तेव्हा त्याच्या आतील दाणे रंगीबेरंगी दिसतात, रेनबो कॉर्न हे पीक सर्वात पहिल्यांदा थायलंड मध्ये दिसले. केरळ मध्ये अब्दुल रशीद ने आपल्या फार्म हाऊस च्या छतावर ड्रॅगन फ्रुट सारखे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले आहे.

वैशिष्ट्यै:

या प्रकारचे कणीसाची चव साध्या मक्याप्रमाणेच लागते, केरळमध्ये अशा प्रकारच्या मक्याचे उत्पादन पहिल्यांदाच घेतले गेले आहे असे अब्दुल रशीद यांनी सांगितले आहे तसेच मला अजून ४ प्रकारच्या मक्याचे उत्पादन घेण्यास रस आहे असेही त्यांनी सांगितले आहे त्याचप्रमाणे या कणसांची वाढ होईल भरपूर सूर्यप्रकाशाची गरज लागते.या कणसांची वाढ ५० दिवसात पूर्णपणे होते तसेच एका झाडाला ३ कणसे लागतात एवढेच नाही तर रशीद ४० प्रकारच्या फळांची शेती सुद्धा करतो. रशीद ने फळांचा व बियांचा अभ्यास करण्यासाठी इंडोनेशिया, थाईलँड, मलेशिया, चीन, सिंगापुर आणि श्रीलंकेला या देशांना भेट दिली आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters