वर्धा : शेती तसेच शेती पूरक व्यवसाय करताना शेतकरी बंधूना अनेक अडचणींना पार करावे लागते. कितीही पूर्वनियोजन असले तरी आपत्कालीन संकटांचा काही नेम नसतो. सध्या राज्यात देवळी तालुक्यातील मलातपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. ज्यात शेतकऱ्याचे अमाप नुकसान झाले आहे. अचानक पाच तास विद्युत पुरवठा बंद झाल्याने पोल्ट्री फार्ममधील तापमान प्रचंड वाढले. परिणामी १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी बंधू कुक्कुटपालनाची जोड देतात. मलातपूरमधील सागर पजगाडे या शेतकऱ्याने देखील शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली मात्र तब्बल पाच तास विद्युत पुरवठा बंद झाल्याने पोल्ट्री फार्ममधील एक हजाराहून अधिक कोंबड्या मृत पावल्या आणि त्यामुळे शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले.
शेतकरी सागर पजगाडे यांनी मलातपूर येथे कुक्कुटपालन केंद्र उभारले आहे. आठ हजार पक्ष्यांची क्षमता असलेले हे कुक्कुटपालन केंद्र असून त्यासाठी त्यांनी बँकेकडून १५ लाखांचे कर्ज घेतले होते. कुक्कुटपालनाच्या व्यवसायात यश मिळायच्या आताच ही दुर्घटना घडली. काही कारणास्तव महावितरणकडून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
जवळजवळ पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये तापमानात कमालीची वाढ होऊन १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामध्ये शेतकरी सागर पजगाडे यांचे बरेच नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्ताला शासकीय मदत द्यावी अशी मागणी आता केली जात आहे.
तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली होती तयारी
अति उष्णतेचा कोंबड्याना त्रास होऊ नये यासाठी या शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एक्सझॉस्ट फॅन व दोन मोठे कूलर लावले आहेत. शिवाय गरज पडेल तसे वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचा तो प्रयत्न करायचा. मात्र महावितरणकडून तब्बल पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ही सर्व यंत्रणा बंद पडली. परिणामी पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मरण पावल्या.
धक्कादायक: ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धक्काबुक्की
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पाहणी
कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेस्थळी जाऊन पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उष्माघातने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याने देवळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
कारखानदारांनो राजू शेट्टींनी सुचवलेला उपाय ऐका; ऊस गाळपाबाबत दिला महत्वाचा सल्ला
टोमॅटोची लाली कायम; ''उत्पादकांना अच्छे दिन", टोमॅटो दरात वाढ
Share your comments