कोणत्या प्रकारचे पीक घेणे आपल्यासाठी फायदेशीर आहे, हे सगळे आपल्या जमिनीत असलेल्या माहितीवर अवलंबून असते. यशस्वी शेतीसाठी मातीची विविधता आणि तिची गुणवत्ता समजून घेणे फार आवश्यक आहे. तसेच आपण जेव्हा पिके घेतो तेव्हा त्या पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी मातीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि जर कुठल्याही घटकाची कशात कमी असेल तर तो घटकाची कमतरता भरून काढणे आवश्यक असते.
आपल्याला माहिती आहे की त्यासाठी माती परीक्षण फार गरजेचे आहे. या माती परीक्षणाचे प्रशिक्षण आता बिहार कृषी विश्वविद्यालय शेतकऱ्यांना देत आहे. चांगली संधी आहे.
मृदा परीक्षणासाठीचा कार्यक्रम
सध्या बिहार कृषि विश्वविद्यालय सात फेब्रुवारीपर्यंत कृषी उत्पादन विक्रेत्यांसाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवत आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकरी संस्थेने माती आणि तिच्यात असलेल्या पोषक तत्वांचा विभिन्न अंगांना समजू शकतात. या कार्यक्रमांमध्ये मातीची तपासणी, आतील घटकांचे सखोल माहिती, रासायनिक खतांचा व्यवस्थित वापर, चुकीच्या उर्वरक का मुळे होणारे नुकसान तसेच माती आणि वनस्पती यांचा संबंध इत्यादी विषयांवर माहिती दिली जाईल.
ह्यामध्ये शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी मातीच्या असलेल्या आरोग्यप्रमाणे आपली शेती करू इच्छितात असे शेतकरी या कार्यक्रमाचा फायदा घेऊ शकतात. या कार्यक्रमांमध्ये माती परीक्षण कसे केले जाते आणि त्याचे परीक्षण केंद्र कुठे कुठे आहेत याबद्दल माहिती दिली जात आहे. एवढेच नाही तर शेणखत, वर्मी कंपोस्ट, हिरवळीचे खत, शेनाचा पुन्हा उपयोग तसेच पिकांचे औषधापासून होणारा फायदा कसा मिळवावा याविषयीची माहिती दिली जात आहे.
ह्या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही 0641 2452604 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
Share your comments