गेल्या काही दिवसांपासून ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. अखेर एकरकमी एफआरपी बाबत निर्णय झाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना हे FRP चे पैसे एका महिन्याच्या आत मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई होणार असल्याचे वक्तव्य सहकारमंत्री अतुल सावे (Minister Atule Save) यांनी केलं.
यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना FRP चा पैसा एक महिन्यात मिळाला पाहिजे असा आदेश साखर आयुक्तांना दिला असल्याची माहिती सावे यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून, एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही साखर कारखानदारांमधील हवेतील अंतराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना काल दिले होते.कापणी व वाहतुकीचे निकष ठरवताना पुढील हंगामापासून वजनकाट्यासाठी डिजिटल वजन काटे सुरू करावेत, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
अखेर राजू शेट्टी यांच्यापुढे सरकार झुकले, आता उसाला मिळणार डिजिटल वजनकाटे
यावेळी त्यांनी ऊस वाहतूकदारांच्या समस्यांबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे सर साखर कारखान्यांनी पालन केले नाहीतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही अतुल सावे म्हणाले. सध्या राज्य सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. महाराष्ट्र हे सहकारमध्ये एक नंबरचे राज्य आहे.
महाराष्ट्रात समान नागरी कायदा होणार? देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
सहकारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देत आहोत. शिंदे आणि फडणवीस हे जनहिताचे निर्णय घेत आहे. यापुढेही असेच लोकहिताचे निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल असेही अतुल सावे म्हणाले. यामुळे आता शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश! स्वाभिमानीकडून संत्र फेकून सरकारचा निषेध
कांद्याच्या विक्रीसाठी 420 किलोमीटर प्रवास, कांद्याची पट्टी आली फक्त 8 रुपये
आता साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Share your comments