शेतकऱ्यांना सध्या अनेक खतांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेती करताना अनेक अडचणी येत आहेत. असे असताना शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते देण्यासाठी अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. यामुळे खते स्वस्तात आणि लवकर उपलब्ध होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील रामागुंडम येथे खत प्रकल्पाचे उद्घाटन करताना ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना खतांच्या जागतिक किमतीचा बोजा सहन करावा लागू नये, यासाठी केंद्राने गेल्या आठ वर्षांत सुमारे 10 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच जुने प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत.
युरिया क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी देशात अनेक वर्षांपासून बंद असलेले पाच मोठे खत प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. रामागुंडम युरिया प्लांट देशाला समर्पित करण्यात आला आहे, तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर प्लांटने त्याचे उत्पादन सुरू केले आहे. जेव्हा हे पाच संयंत्र पूर्णपणे कार्यान्वित होतील, तेव्हा देशाला 6 दशलक्ष टन युरिया प्राप्त होईल.
शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी सीबीलची अट नको, शेती करणे झाले अवघड
यामुळे आयातीवरील खर्चात लक्षणीय बचत होईल आणि युरिया अधिक सहज उपलब्ध होईल. भविष्यात भारत युरिया या एकाच ब्रँडखाली युरिया उपलब्ध करून दिला जाईल, कारण याआधी अनेक प्रकारच्या खतांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता, असेही मोदी यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात टाटा पॉवर उभारणार 150 मेगा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...
भारत लवकरच चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि त्या दिशेने ते आधीच वाटचाल करत आहे. देशाने 1990 नंतर म्हणजेच गेल्या तीन दशकांत जो विकास पाहिला आहे, तो गेल्या आठ वर्षांत झालेल्या बदलांमुळे काही वर्षांत होईल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांची वीज पुन्हा तोडण्यास सुरुवात, पिके लागली जळू
शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर..
'शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न सुरु'
Share your comments