शेतीमध्ये सध्या अनेक बदल होत चालले आहेत. यामुळे अनेक बदल दिसत आहेत. असे असताना खरिपाची तयारी सुरू झाली आहे. जमीन मशागत करणे सुरू आहे. यासोबत एक अतिशय चुकीचे काम सुरू आहे. ते म्हणजे संपूर्ण शेतातील बांध व जमीन जाळून टाकून जमीन चांगली करने. या छोट्या चुकीमुळे शेतकरी, पर्यावरण, जैवविविधता, जैविक साखळी याची कधीही न भरून येणारे मोठे नुकसान होते आहे.
आजच्या घडीला शेतात फक्त कडू निंब व बाभूळ याची झाडे आहेत. फळांची झाडे नाहीत, पशु, पक्षी यांचे निवास नष्ट झाले, खाद्य संपले. बांधावरील झुडपे संपली, मधमाशा संपल्या झुडपात पक्षाचे घरटे, अंडी, पिले, जळून खाक झाले. त्यामुळे अन्न साखळी नष्ट झाली. याच कारणामुळे पिकावरील किड मोठ्या प्रमाणावर वाढली आणि ते नियंत्रणासाठी खूप मोठा रसायनांचा वापर आणि उरलेल्या उपयुक्त किड नष्ट होत आहे.
केवळ याच कारणामुळे हे अखंड दृष्ट चक्र सुरू आहे. यात शेतकरी व पर्यावरण संपूर्ण नष्ट होईल. दिसायला खूप लहान गोष्टी पण यातच शेतकरी, शेती, पर्यावरण आणि माणूस यांचा शेवट आहे. तेव्हा शेतकरी बांधवाना नमृ विनंती करतो कि, शेतीचे बांध जाळून टाकू नका, बांधावर गवत, झुडपे, फळझाडे खूप खूप वाढू द्या, ४-५ वर्षात बघा, शेतीला खूप पोषक वातावरण निर्माण होईल.
भारतीय शेतीतील सिंचन व्यवस्थापन
शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. कृषी विभागानं खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांपुढे यंदा रासायनिक खतांच्या वाढत्या दराची मोठी समस्या आहे. राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत सुरु केली आहे.
पीक विम्यापासून अजूनही शेतकरी वंचीत, शेतकरी संघटना आक्रमक..
शेतकऱ्यांपुढे यंदा रासायनिक खतांच्या वाढत्या दराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागातील शेती ही प्रामुख्याने जिरायती म्हणजेच कोरडवाहू आहे. अशी शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पावसाची सुरुवात वेळेवर झाली असल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत.
अजून तीन दिवस पाऊस, गारपिटीचा शक्यता, 'या' ठिकाणी होणार पाऊस, जाणून घ्या..
धक्कादायक! बैलगाडा शर्यतीसाठी गेलेल्या युवकाच्या पोटात बैलाने खुपसले शिंग, तरुणाचा जागीच मृत्यू..
भारतीय शेतीमध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे फायदे
Share your comments