1. बातम्या

जैवविविधता- काय आहे जैवविविधता, जाणून घ्या महत्व आणि व्याप्ती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
जैवविविधता

जैवविविधता

 जैवविविधतेत निसर्गातील दृश्य स्वरूपातील सगळ्या घटकांचा समावेश होतो. मानव, पशुपक्षी, वनस्पती इत्यादी. 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपण जैवविविधतेचे महत्त्व आणि त्याचे घटका बद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.

पक्षी हा घटक जैवविविधते मधील सगळ्यात महत्वाचा घटक समजला जातो. अन्नसाखळी मध्ये सगळ्यात वरचे स्थान हे महत्वाचे समजले जाते जर जगभरातील पक्ष्यांच्या प्रजातीचा विचार केला तर जगभरात जवळपास ५०००  प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. जैवविविधतेमध्ये असलेल्या सगळ्यात मोठे परिसंस्था अबाधित ठेवण्याचे काम हे पक्षी करतात. झाडावर राहणारे पक्षी तसेच पाण्यावर राहणारे पक्षी हे पृथ्वीवरील अन्नसाखळी आणि जैवविविधता संपन्न संपन्न ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.

 जर पक्षांमधील सुतार, धनेश आणि तांबट पक्षी हे विविध वृक्षांची फळे खातात व त्यांच्या विष्टेद्वारे सुलभ बीज आवरण करतात. त्याचा उपयोग हा वनस्पती उगवण्यास तसेच वने वाढण्यासाठी होतो.तसेच सूर्यपक्षी,शिंजीर, फुलते चष्मेवाला हे पक्षी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मद्यप्राशन करीत उडणारे छोटे पक्षी आहेत. त्यामुळे या पक्ष्यांची मदत ही परागीभवनाचे कामांमध्ये होते आणि फुलांना विविध रंग बहाल करण्यात होते. तसेच सुतार पक्षी हा विविध झाडाला लागलेली वाळवी, झाडाच्या सावलीखाली वाढणारी कीड खातात आणि वृक्षाचे आयुष्य वाढवतात. पाण्यातील जैविक साखळी अबाधित ठेवण्याचे काम हे पाणथळीत चरणारे  पक्षी, मासे, खेकडे, शिदोळ हे किटक आणि पक्षी पाण्यातील कीटक खाऊन करतात. तसेच गिधाड, कावळे, घार इत्यादी पक्षी हे मरून पडलेल्या प्राण्यांचे मांस, त्वचा आणि आतडे असे सर्व अवयव खाऊन  परिसर स्वच्छ करतात. उंदीर हा छोटा प्राणी शेतकऱ्यांच्या धान्याचे तीस टक्के नुकसान दरवर्षी करीत असतात. या उंदरांना मारून खाण्याचे काम हे घुबड आणि गरुडाच्या काही प्रजाती करतात. तसेच गाय बगळे व इतर तत्सम पक्षी पाळीव प्राण्यां सोबत चरतात.

 

हे पक्षी गाय, म्हशी व इतर पाळीव प्राणी  जसे की मेंढ्या, बकऱ्या  त्यांच्या त्वचेवर आढळणारे कीटक, गोचीड खाण्याचे काम करतात. असे असंख्य उदाहरणे देता येतील. थोडक्यात म्हणजे  जमिनीतील किंवा पाण्यातील कीटकांची संख्या नियंत्रित करण्याचे काम आहे फक्त पक्षी करतात. पृथ्वीवरची जंगले ही पक्षाने द्वारे पसरलेली आहेत. जंगलातील वनस्पतींची वृक्षांची झुडपांची विविधताही विविध पक्षांच्या बीजारोपण यामुळे शक्य झाले आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तर विविध वनसंपत्ती नटलेले आपले राज्य आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण इत्यादी जे महाराष्ट्राचे विभाग आहेत हे सगळ्या विभागात मिळून साधारणतः 1081 जातीच्या तीन हजार पंचवीस पक्षांच्या प्रजाती सापडतात तसेच यामध्ये नवनवीन प्रजातींचे भर पडतेच आहे याशिवाय अलगी, फंगी, नेचे वर्गीय याही वनस्पती येतात. आज मितीला अंदाजे 25 साती आणि 694 प्रजाती भारतात सापडत असलेल्या प्रदेश निष्ट वनस्पती असून त्यापैकी आठ जाती आणि 157 प्रजाती महाराष्ट्रात प्रदेशनिष्ठ आहेत.

आपण जे अन्न खातो त्यापैकी 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वनस्पती या गवत वर्गीय आहेत. परंतु दुर्दैव असे आहे की, गवताळ प्रदेशांना आपण पडीक दुर्लक्षित जमीन समजतो पण या पडीक जमिनीवर वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची विविधता आढळून येते. याच गवताळ जमिनींवर मोठ्या प्रमाणात गवताचे निर्मूलन करून वनीकरण करण्यात येत आहे. जैवविविधतेमध्ये विविध खाण्यायोग्य वनस्पती भाजीपाला, कडधान्य, वेलवर्गीय वनस्पतींचाही समावेश होतो.. आज बऱ्याचशा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून हाय ब्रीड बियाण्यांचा  सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पारंपारिक बियाण्यांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. जर आपण गावरान आंब्याचा विचार केला तर त्या आंब्यामध्य चव, रंग, वास आणि आकार अशी विविधता सापडतात.

 

रानमेव्याचा विचार केला तर त्यामध्ये जांभूळ, करवंद, फणस यामध्येही विविधता आढळते. ही जैवविविधता जपण्यासाठी विविध गावरान वाहनांचे बीज संकलन करून ते रोपवाटिका निर्माण करणे हे कार्य एक चळवळ प्रमाणे बनले पाहिजे. तसेच गावरान भेंडी वांगी वांगी, टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय गावठी पडवळ, दोडका, गिलके, पोकळा इत्यादी रानभाज्या व कंदभाज्या चे सर्व स्थानिक वाण रोग आणि कीड ना प्रतिकार करणार आहेत तसेच खायला देखील रुचकर आणि पौष्टिक आहेत. परंतु या सगळ्या जाती आता ऱ्हास होताना दिसत आहे.पूर्व हिमालय व पश्चिम घाट येथे दोन जैवविविधतेने समृद्ध हॉट स्पॉट आहेत. उच्चप्रतीची प्रदेशनिष्ठ ता, नवीन प्रजातींचा शोध आणि मानवी हस्तक्षेप यामुळे दोन भाग अतिसंवेदनशील आहे.

वनस्पती हा मानवी जीवनाचा मूलाधार मानला जातो. वैश्विक तापमान वाढ, वातावरण बदल या जागतिक समस्या मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झाले आहेत. तुला संकटातून आपल्याला वनस्पती विविधता  वाचू शकणार आहे. जैवविविधतेबाबत आपण जगात सातव्या क्रमांकावर आहोत. ही बाब आपल्यासाठी गौरवास्पद आहे. हे टिकवण्यासाठी कमी होत जाणारे जंगल क्षेत्र  वाचवणे आणि वनस्पती विविधता अबाधित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी एक लोकचळवळ उभी राहणे फार महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय वन  धोरणानुसार आपल्या देशांमध्ये तेहतीस  टक्के जंगलक्षेत्र असणे फारच आवश्यक आहे.

 

परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ते क्षेत्र फक्त 14 टक्के आहे. नैसर्गिक रित्या जंगल निर्माण होण्यासाठी हजार वर्षांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. आज मानवी हस्तक्षेपामुळे वनस्पती जैवविविधतेचा  ऱ्हास मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यासाठी  अयोग्य पद्धतीने जमिनीचा वापर, अशाश्वत खाणकाम, बेलगाम पणे चालत असलेले पर्यटन, वनांना लागलेली आग एक रस्ते तसेच लो मार्गांचा विकास इत्यादी बऱ्याचशा गोष्टी या जैवविविधता ऱ्हास सास  कारणीभूत आहेत.

  जैवविविधतेत महाराष्ट्र जगात पहिल्या दहा महत्वाच्या देशात भारताचा क्रमांक लागतो. जागतिक जैवविविधतेच्या तब्बल आठ टक्के जैवविविधता भारतात आढळते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ढोबळ मानाने एकूण 127 सस्तन प्राणी,630 पक्षी, 540 फुलपाखरे, सातशेच्या वर कोळ्यांच्या प्रजाती, 47 प्रकारचे चतुर तसेच शंभरच्यावर सरीसृप प्राणी आढळून येतात.. म्हणजेच महाराष्ट्रही यात कुठेच मागे नाही. अलीकडच्या काळात जमेची बाजू म्हणजे  जैवविविधता संवर्धन व कायद्याच्या दृष्टीने बरेचसे बदल घडून आले आहेत.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters