शेतकऱ्यांनी अवजार विकत घेतल्यानंतर अधिक काळ चालण्यासाठी त्याची देखभाल आवश्यक असते. देखभालीविना अवजारांची उपयुक्तता, कार्यक्षमता कमी होत जाते. कामही चांगले होत नाही, तसेच ते चालण्यासाठी अधिक ऊर्जाही लागते. अवजारांची देखभाल आणि निगा कशी घ्यावी, हे शेतकऱ्यांना माहिती नसते.
पेरणी व टोकण यंत्राची काळजी :
प्रमाणित बियांची मात्रा मिळविण्यासाठी बियाणे वितरण यंत्रणेचे समायोजन (कॅलिब्रेशन) करावे.
बियांची पेरणी प्रमाणित खोलीवर होते की नाही, हे तपासत राहावे.
बियांची पेरणी झाल्यानंतर त्यावर मातीची हलकी पसरण होईल याची काळजी घ्यावी.
बियाणे व खत वितरण करणाऱ्या नळ्या व्यवस्थित साफ कराव्यात.
पेरणी व टोकण यंत्र चालविताना प्रमाणित व कॅलिब्रेशन केलेल्या गतीवर चालवावे.
चालकाने पेरणी व टोकण करण्यापूर्वी बियाणे यंत्रणेची तरफ समायोजन (कॅलिब्रेशन) केलेल्या मापावर लावावी.
रोटाव्हेटरची निगा व देखभाल :
रोटाव्हेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे. सर्व प्रिंसिंग पॉइंटवर ग्रीस लावावे.
गिअर बॉक्समधील वंगण तेलाची पातळी तपासावी.
पाते (ब्लेड) ढिले, वाकलेले अथवा मोडलेले नसल्याची नियमित खात्री करावी.
रोटरच्या बेअरींगमध्ये गवत किंवा पालापाचोळा अडकलेला नसल्याची खात्री करावी.
शेतकऱ्यांनो शेत जमीन जाळू नका, जाणून घ्या..
मळणी यंत्राबाबत दक्षता व काळजी :
मळणी यंत्राच्या सिलींडर आणि कॉन्केव्ह या दोन्ही भागातील अंतर योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.
यंत्र सुरू करण्यापूर्वी यंत्राचा कोणता भाग लूज नसल्याची खात्री करावी
मळणी यंत्र ठेवताना शक्यतो वाऱ्याच्या दिशेला भुस्सा बाहेर पडेल, असे ठेवावे.
मळणी यंत्राच्या फिरण्याची दिशा यंत्रातील चिन्हाप्रमाणे असल्याची खात्री करावी.
मळणी यंत्राच्या सर्व बेअरिंगजना आणि फिरणाऱ्या भागाला योग्य ते वंगण घालावे.
भात लागवड यंत्राची देखभाल :
प्रत्येक दिवशी काम झाल्यानंतर भात लागवड यंत्र स्वच्छ धुवून घ्यावे.
फिरणाऱ्या भागांवरील चिखल व्यवस्थित साफ करावा.
यंत्र स्वच्छ धुऊन वाळल्यानंतर सर्व फिरणाऱ्या व घसरणाऱ्या भागांना वंगण द्यावे.
कमे सुरू नसलेल्या काळामध्ये ठराविक सर्व्हिसिंग करावी. पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी शेडमध्ये ठेवावे.
काम नसल्यास बॅटरीचे कनेक्शन वेगळे करून कोरड्या व उन्हापासून दूर जागेत ठेवावीत.
शेतकऱ्यांनो दुधाळ जनावरांसाठी अधुनिक आहार पद्धती जाणून घ्या, होईल फायदा..
कल्टिव्हेटर यंत्राची देखभाल :
यंत्र वापरानंतर व्यवस्थित धुवून तसेच पुसून ठेवावे.
पात्यांना गंज प्रतिबंधक रसायन किंवा खराब झालेले इंजिन ऑइल लावावे. अन्य भागांना ऑइल पेंट द्यावा.
वापरण्यापूर्वी सर्व नटबोल्टस तपासून घ्यावेत. आवश्यकतेनुसार घट्ट करावेत.
वापरानंतर यंत्र शेडमध्ये ठेवावे. पाऊस आणि ओलाव्यापासून संरक्षण केल्यास यंत्राचे भाग गंजणार नाहीत.
कडबाकुट्टी यंत्राची काळजी व दक्षता :
यंत्राला लागणारे व्होल्टेज योग्य असल्याचे तपासून यंत्र सुरू करावे.
यंत्राची पाती ब्लेड व्यवस्थित लावावीत. यंत्राची दाढ व पाती ब्लेड मधील अंतर योग्य राखावे.
पात्यांची धार चांगली असावी.
यंत्राच्या कटिंग व्हील व पुली यांचे बोल्ट काढून चाक हाताने फिरवून खात्री करावी.
कमी वैरण घालून म्हणजेच साधारण एक पेंढीपेक्षा कमी वैरण घालून यंत्र चालविल्यास वैरण व्हीलच्या मध्यभागी व दोन्ही बाजूला गुंडाळून यंत्रावर लोड येतो.
मद्यपान किंवा धूम्रपान करत मशिनवर काम करू नये.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यूचा आकडा 11 वर, उन्हात कार्यक्रम घेतल्याने होतेय टीका
शेतकरी मुलांच्या लग्नासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, मुलीला 10 लाख देण्याची मागणी...
पिवळ्या कलिंगडाला मोठी मागणी! शेतकरी होतोय मालामाल...
Share your comments