गेल्या 2 वर्ष्यापासून कोरोनाच्या महामारी मुळे सर्वच शेतकरी वर्गाचे गणित बिघडले होते. बाजारपेठा बंद असल्यामुळे उत्पन्न निघून सुद्धा काही उपयोग नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा तोटा झाला होता. तसेच कोरोना महामारी च्या काळात फुलउत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे कारण कोरोनाच्या काळात मंदिरे बंद होती तसेच सण साजरे करण्यास परवानगी नसल्यामुळे फुलांची मागणी पूर्णपणे थांबली असल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले होते.
यंदाचे वर्ष गुलाब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर गेले आहे:
प्रेमाच प्रतीक म्हणजे गुलाबाच्या फुलाला महत्व दिले जाते. गेल्या 2 वर्ष्यापासून बळीराजावर वेगवेगळ्या प्रकारची संकटे येत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला शिवाय आंतरराष्ट्रीय निर्यात सुद्धा बंद असल्याने मागणी सुद्धा कमी होती.यंदा चे वर्ष गुलाब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर गेले आहे. यंदा च्या वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या कारणामुळे गुलाबची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे. तसेच या दिवसात बाजारात गुलाबाला प्रचंड प्रमाणात मागणी सुद्धा होती. तत्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्येही सुगीचे दिवस आले आहेत. गुलाबाच्या फुलाला निमित्त व्हॅलेंटाईनचे का असेना परंतू त्या कारणामुळे तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे.
गुलाब विक्रीमधून 40 ते 45 कोटींची उलाढाल:-
व्हॅलेंटाईन डे च्या काळात गुलाबाच्या फुलाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच व्हॅलेंटाईन डे च्या काळात गुलाबाच्या फुलाला प्रचंड मोठ्या प्रमाणात महत्वाचे समजले जाते. परंतु याच काळाचा फायदा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी वर्गाला झाला आहे.गेल्या 2 वर्ष्यात झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी मावळ मधील शेतकऱ्यांनी गुलाबांच्या फुलांची निर्यात परदेशात केली आहे. मावळ मधील शेतकऱ्यांनी अडीच कोटी फुलाची निर्यात केली होती. या मधून त्यांना सुमारे 40 ते 45 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे शिवाय यातून त्यांना बक्कळ पैसा सुद्धा मिळाला आहे.
स्थानिक बाजारपेठांचा मोठा आधार:-
व्हॅलेंटाईन डे’ मुळे देशात तसेच परदेशातून सुद्धा गुलाबाच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सध्या भारतातून गुलाबांच्या फुलांची निर्यात परदेशात करावी लागत आहे. त्यामुळे वाढत्या मागणीमुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून 1 कोटी गुलाबाच्या फुलांची निर्यात केली होती परंतु निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत गुलाबाला चांगला भाव मिळत आहे.
परदेशात निर्यात झालेल्या फुलाला बाजारात 13 ते 14 रुपये प्रति नग भाव मिळत आहे आणि स्थानिक बाजारपेठेत गुलाबाला 15 ते 16 रुपये एवढा भाव मिळाला असल्याचे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून फुल उत्पादक शेतकरी तोट्यात होते परंतु यंदा च्या वर्षी मागणी वाढल्याने फुलाच्या भावात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने शेतकरी आनंदित आणि समाधानी आहेत.
Share your comments