शेती करणे म्हणजे आजकाल एक जिकीरीचे काम झाले आहे. शेतीत परवडत नाही म्हणून अनेकजण चांगली शेती असून देखील नोकरीकडे वळतात. असे असताना सरकार अनेक शेतीपूरक योजना आणत असते. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यामधून चांगले पैसे मिळतील हा यामागचा हेतू असतो. आता केंद्र सरकार बांबू शेतीसाठी 'राष्ट्रीय बांबू मिशन' ही महत्त्वाची योजनाही राबवत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यासाठी बांबू लागवडीवर अनुदान दिले जाते. यामुळे ही योजना फायदेशीर आहे.
सध्या बांबू लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. असे असले तरी खेड्यापाड्यात आजही शेतकरी बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र त्यांना याबाबत अधिक काही माहिती नाही. केंद्र सरकारने राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले असून त्याअंतर्गत बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. या अभियानांतर्गत सरकार बांबू लागवड करणाऱ्यांना प्रति रोप आर्थिक मदत देते. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये सरकार शेतकऱ्यांना 120 रुपये प्रति रोप या दराने मदत करते. यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसंदर्भात केंद्र सरकारची अधिकृत वेबसाइट https://nbm.nic.in/ यावर अधिक माहिती घ्यावी. यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
बांबूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बांधकाम कामांमध्ये, फर्निचर, कापड, कागद, लगदा, सजावटीच्या वस्तू इत्यादींमध्येही बांबूचा वापर केला जातो. यामुळे केंद्र सरकारने यासाठी योजना आखली आहे. अनेक वस्तू यामधून बनवल्या जातात. अगोदरच्या नियमांमध्ये बदल करून शेती करणे सोपे करण्यात आले. आता सरकार यासंबंधित उद्योगाला चालना देण्याचा विचार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. मोदी सरकार यासाठी प्रयत्नशील आहे.
येणाऱ्या काळात बांबू आर्थिक क्रियाकलापांचा एक प्रमुख आधारस्तंभ बनणार आहे, मोदी सरकार देशांतर्गत बांबू उद्योगाला चालना देण्याची योजना आखत आहे, जे भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. बांधकाम साहित्य म्हणून बांबूच्या वापरास मदत आणि प्रोत्साहन देईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. यामुळे याची लागवड येणाऱ्या काळात वाढणार आहे. एकदा तुम्ही बांबूची लागवड केली तर तुम्हाला २५ ते ३० वर्ष पुन्हा लागवड करावी लागणार नाही. आपल्याकडे सुमारे 136 बांबूच्या प्रजाती आहेत आणि दरवर्षी 13 दशलक्ष टनांपेक्षा जास्त बांबूचे उत्पादन होते.
Share your comments