अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकरी ग्रामस्थांनी आंदोलनाला आजपासून सुरुवात केली आहे. 5 वर्षानंतर पुन्हा हे शेतकरी आंदोलन सुरु झाले असून आता पुढील 5 दिवस हे धरणे आंदोलन चालू राहणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण आज सकाळी बळीराजाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरुवात केली असता काही वेळातच
आंदोलनाचे नेते व पुणतांबा गावचे सरपंच धनंजय धनवटे यांच्यासह बऱ्याच जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनानेदेखील कारवाईच्यान अनुशंगाने पावले उचलली आहेत. सरकार हे आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे आता पुढील पाच दिवस कोणत्या राजकीय घडामोडी घडणार आहेत हे पहावे लागणार आहे.
आंदोलन तर होणारच
राज्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत मात्र या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला. मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन केले होते शिवाय वेळीच मागण्या पूर्ण नाही झाल्या तर
आंदोलनाला सुरुवात होईल असं त्या निवेदनात नमूद करण्यात आले होते. मात्र तरीही सरकारने त्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. उलट आंदोलकांनाच नोटीसा बजावण्यात आल्या. काहीही झालं तरी 5 दिवस धरणे आंदोलन पार पडणारच अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
मराठमोळ्या शेतकऱ्यांनी करून दाखवले; आता चाळीतील खराब कांद्याची चिंता मिटली
2017 साली झाले होते धरणे आंदोलन:
पुणतांबा येथे ग्रामपंचायतीसमोर मोठ्या सभामंडपात शेतकऱ्यांनी मुख्य मागण्या घेऊन धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज आंदोलनाचा पहिला दिवस असून राज्यभरातून शेतकरी या आंदोलनाला येणार आहेत. याआधी 2017 ला याच ठिकाणी झालेले आंदोलन राज्यभर पसरले होते. त्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या होत्या.
आंदोलकांना बजावली नोटीस
गावचे सरपंच धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, सुभाष कुलकर्णी, सभाष वहाडणे या नेत्यांना सीआरपीसी १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याचे कारण दिले आहे. यावर राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये कारण आम्ही आंदोलनावर ठाम असल्याची भुमिका आंदोलकांनी व्यक्त केलीय .
महत्वाच्या बातम्या:
मोदी सरकारचा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा; गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, वाचा नवे दर
पावसाने दिली शेतकऱ्यांची साथ आणि शेतकऱ्यांनी केला पेरणीचा श्रीगणेशा
Share your comments