सध्यपरिस्थितीला प्राण्यांच्या हल्ल्यात बऱ्याच जणांनी आपला जीव गमावल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या. कधी शेतात काम करताना तर कधी शेतात काम करण्यासाठी जाताना प्राण्याच्या हल्ल्यात नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. विशेषतः शेतकरी बंधूना शेतात काम करत असताना साप व इतर अनेक गोष्टींपासून जीवाला धोका असतो. बऱ्याचदा शेतकरी रात्रीच्या वेळी शेत कामासाठी जात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्यांचादेखील हल्ला होतो.
काही भागात तर वन्यप्राणांच्या वाढत्या हालचालीमुळे तेथील नागरिकांना धोक्याची घंटा आधीच दिली जाते. मात्र गडचिरोली भागात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत बऱ्याच नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. अशीच एक दुर्घटना घडली आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली परिसरात. गुरे चरायला गेलेल्या एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. मात्र प्रसंगावधान साधत त्या शेतकऱ्यानेही अस्वलावर कुऱ्हाडीने वार केले मात्र यात दोघेही गंभीर जखमी होऊन मरण पावले आहेत.
ही घटना घडली आहे एटापल्ली वनपरिक्षेत्रातील देवदा बीटअंतर्गत येणाऱ्या बटेर गावाजवळ घडली आहे. सम्मा होडपे दुग्गा असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सम्मा होडपे दुग्गा हे नेहमीप्रमाणे शेतात बकऱ्या चरायला गेले होते. परिसरात सातत्त्याने होत असलेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांनी सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून कुऱ्हाडही ते आपल्या जवळ ठेवत होते.
Lever Health:'या' पेयांचे सेवन यकृताला ठेवतील फिट अँड हेल्दी, वाचा त्याबद्दल माहिती
त्याच दिवशी अचानक झालेल्या हल्ल्यात शेतकरी सम्मा यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाडीने अस्वलावर वार केले. मात्र या कडव्या झुंजीत दोघेही गंभीर जखमी झाले आणि रक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशीही गावकर्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली नाही. मात्र अस्वलाचा मृत्यू झाला हे वनपरिक्षेत्राधिकारी प्रकाश झाडे यांना माहिती समजताच त्यांनी वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.
महत्वाच्या बातम्या:
विदर्भावर विजेचे संकट; एकाच दिवशी घेतला आठ शेतकऱ्यांचा बळी
आमदार हॉटेलमध्ये मजेत, कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी
Share your comments