स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांच्या ठिय्या आंदोलनास यश.
तुपकरांसह पन्नास शेतकऱ्यांनी केले होते मुंडन.
विमा कंपनीने विम्याची रक्कम न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,यांच्यासह
शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत चिखली तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते.याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका;अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा दिल्याने तनावपुर्ण परीस्थीती निर्माण झाल्याने प्रशासनाने नमती भुमीका घेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री नरेन्द्र नाईक यांनी आंदोलनस्थळ गाठुन तालूक्यातील १३५०शेतकऱ्यांच्या खात्यावर १कोटि रक्कम तात्काळ जमा करण्याचे व इतर मागण्यांच्या अनुषंघाने अश्वासन दिल्याने रात्री ७वाजता स्वाभिमानीच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे.यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांना जाणूनबुजून विम्याची रक्कम अदा केली नाही. शेजारच्या शेतकऱ्याला विम्याची नुकसान भरपाई मिळाली. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सुद्धा डावलण्यात आले तर अनेकांना कमी रक्कम देण्यात आली आहे.
अतिवृष्टी,गारपीट व नदिच्या पुरामुळे आणि विविध आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होवुनही विमा कंपनी कडुन शेतकऱ्यांना डावलण्याचा घाट घातला जात असल्याने चुकीचे सातबारा दिल्याचे खोटे कारण सांगून कंपनीने तब्बल ३९० शेतकऱ्यांच्या २० लाखांच्या विमा रकमेला कंपनीने होल्ड लावल्याने व हजारो तक्रारी प्राप्त होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,सतिष सुरडकर,प्रल्हाद देव्हडे,रामेश्वर चिकणे,आशु जमदार यांच्यासह शेतकऱ्यांनी स्वाभिमानी ने पुन्हा एकदा पिक विम्यासाठी लढा उभारत आंदोलनाचे हत्यार उपसले होते.तर दि१३जानेवारी पासुन तालुका कृषी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती.
परंतु पाच दिवस उलटुनही आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने व वेळकाढु पणा अवलंबला जात असल्याने स्वाभिमानीचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळ गाठुन प्रमुख न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने विमा कंपनी आणि कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निषेध नोंदविण्याकरिता रविकांत तुपकर, आंदोलकर्ते विनायक सरनाईक यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले.आणि आम्ही मुंडण केले आहे.पण,याद राखा!शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम देण्यास दिरंगाई केली तर कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही
असा सज्जड इशारा रविकांत तुपकर यांनी दिल्याने प्रशासन खडबडुन जागे झाले आणि तुपकरांच्या आक्रमक रुद्रावतार पाहूण सबंधीत यंत्रणा व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी आंदोलनस्थळ गाठुन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत प्रमुख मागण्यांच्या व विमा कंपनीने शेतकऱ्यांना कसे डावलले या दृष्टिने तुपकरांनी शेतकर्याच्या समस्या जाणुन घेत चर्चा करण्यात आली असल्याने चर्चे अंती कंपनीच्या वरीष्ठांना आंदोलनाचे गांभीर्य लक्षात आणुन दिल्याने जिल्ह्यातील५११६ शेतकऱ्यांना ३कोटी ५६लाख ७६हजार व तालूक्यातील १३५०शेतकऱ्यांना अंदाजे एक कोटी त्याच्या तात्काळ खात्यावर जमा करुण याची यादी १८जानेवारी रोजी देण्यात येईल कमी पिक विमा रक्कम मिळाल्यांची व वाढिव रक्कमेची यादी उपलब्ध करुण देण्यात येईल,ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.परंतु त्यांनी नुकसानीचा अर्ज कंपनीकडे केला नाही.अशा शेतकऱ्यांना(NDRF)नैसर्गीक आपत्तीचा पंचनामा ग्राह्य धरुण नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत आहे,तसेच नदिकाठच्या गावातील शेतातील बाधित क्षेत्राची नुकसानीची टक्केवारी९५%
प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल,ज्या शेतकऱ्यांना एकाच गावांमध्ये एकाच पिकासाठी कमी जास्त म्हणजेच वेगवेगळी रक्कम मिळालेली आहे अशा परीस्थीतीत मंडळ स्तरावर सर्वाधीक नुकसान भरपाई मिळालेल्या
शेतकऱ्यांकडील जास्त मिळालेली रक्कम ग्राह्य धरुण त्यातील फरकाची रक्कम काढुन तसा वाढिव रक्कमेचा प्रस्ताव कंपनीस पाठवण्यात येईल, प्रत्यक्ष सुचना फॉर्म भरताना विमा कंपनीच्या साइटवर सॉफ्टवेअर मध्ये काही फेरफार करूण सोयाबीन पिकाऐवजी तुर पीक नोदणीसाठी येत आहे का याची खातरजमा करूण असे होत असल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल यासह आदि मागण्यांचे लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.तर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकरी यांना स्वाभिमानीच्या आक्रमक भुमिकेमुळे दिलासा मिळाला आहे. तर मागण्यांची पुर्तता न झाल्यास व शेतकरी विमा योजनेपासुन वंचीत राहल्यास पुढचे आंदोलन जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयात असेल असा इशारा रविकांत तूपकर,यांच्यासह आंदोलकर्ते यांनी दिला आहे.
अनेकांनी केले मुंडन.
तुपकरांसह आंदोलनकर्ते विनायक सरनाईक,सतिष सुरडकर,प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे,भारत वाघमारे,अविनाश झगरे,सुदर्शन वाघमारे,राम आंभोरे,अनिल चौहाण,गजानन कुटे,सचिन कुटे,रमेश कुटे,राहुल पवार,आशु जमदार यांच्यासह आदिंनी मुंडन आंदोलन करीत निषेध नोंदवला
Share your comments