Farmer suicide: राज्यात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो हेक्टर जमिनीवरील खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांकडून पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. मात्र सोयाबीन पिकाचे (Soyabean Crop) नुकसान झाल्याने परभणी मधील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
परभणीच्या (Parbhani) मिरखेल येथील शेतकऱ्यांनी (Farmer) पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात आंदेलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी साठल्याने सोयाबीन खराब झाले आहे.
यामुळे सरकारच लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या शेतामध्ये अर्धनग्न होत अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. तसेच पीक विमा आणि सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परभणीतील कौसडी येथील गुलाब जीवने (वय २४) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. मुसळधार पावसाने सोयाबीन पीक उध्वस्त झालं आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कस फेडायचं या तणावातून या शेतकऱ्याने जीवन संपवलं आहे.
तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले.
दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत मोठे अपडेट, पहा नवीनतम दर...
बीडमध्येही शेतकऱ्याची आत्महत्या
बीडमध्येही परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात राजेगाव येथील संतोष दौंड येथील शेतकऱ्यानेही पावसाने पिक उद्धवस्त झाल्याने आत्महत्या केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी आत्महत्येवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तेची धुंदी आणि एकमेकांचा पक्ष संपवण्याच्या नादात व्यस्त असलेल्या राजकारणी आणि सरकारला अन्नदात्या शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायलाच हवे असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! पगारात इतक्या टक्क्यांनी वाढ, 5 वर्षांची DA थकबाकी मिळणार
IMD Rain Alert: राज्यात अजूनही पावसाचा इशारा; तर या दिवशी सुरु होणार गुलाबी थंडी
Share your comments