परतीच्या पावसानं अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. आधी अतिवृष्टी नंतर परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून (farmers) सरकारडे वारंवार मदतीची मागणी केली जात आहे. पिकांचं न भरून निघणार नुकसान झालेलं असताना पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील केलवड येथील एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून एका गुंठ्यामागे चक्क ५ रुपयेप्रमाणे रक्कम खात्यात जमा झाली आहे. बाबूराव गमे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आधीच राज्यातील शेतकरी आर्थिक संकटांमुळे खचले आहेत त्यात पीक विमा (Crop Insurance) कंपनीकडून असा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये आता पीक विमा कंपन्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.
त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी बाबूराव गमे यांनी त्यांच्या सहा एकराहून अधिक क्षेत्रात सोयाबीन (Soybean) पिकाची लागवड केली होती. तसेच त्यांनी या सगळ्या क्षेत्राचा जवळपास तीन हजार रुपये विमा उतरवला होता. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे केलवड गावातील शेतकऱ्यांचं जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे.
मात्र ज्यावेळी नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तेव्हा मात्र विमा कंपनीकडून खात्यावर १ हजार ४०६ रुपये म्हणजे गुंठ्यामागे ५ रुपये प्रमाणे रक्कम जमा झाली. त्यामुळे शेतकऱ्याकडून आता संताप व्यक्त केला जात आहे. सध्या राज्यात पडणाऱ्या परतीच्या पावसाने बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आता नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
काहीच हाती न लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त होऊन टोकाचं पाऊल उचलत आहेत. आत्महत्यामुक्त राज्य करू हे केवळ शाब्दिकच राहिले आहे. यावर लवकरात लवकरात अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
नुकसान होऊनही बरेच शेतकरी विम्यापासून वंचित
राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं अमाप नुकसान होऊनही ते विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपन्यांच्या या धोरणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता न्यायालयात याचा काय निकाल लागणार? शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडून केलं आंदोलन
इथेनॉलच्या किमती वाढणार, खतांवर सबसिडीही मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा..
धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित
Share your comments