MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 'किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा

सातारा : प्रत्ये‍क जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. या बँकांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम अतिशय चांगले असून या बॅंकेचे काम इतर बँकांसाठी दिशादर्शक आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने ‘किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा सुरु करुन एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.

KJ Staff
KJ Staff


सातारा:
 प्रत्ये‍क जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. या बँकांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम अतिशय चांगले असून या बॅंकेचे काम इतर बँकांसाठी दिशादर्शक आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने ‘किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा सुरु करुन एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.

येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज किसान एम पे मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबईचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, दादासाहेब खर्डेकर, नाबार्डचे सुबोध अभ्यंकर, विभागीय सह निबंधक धनंजय डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, आदी यावेळी उपस्थित होते.

सहकार समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्र समृद्ध होणार नाही, असे सांगून सहकार मंत्री सुभाष देशमुख पुढे म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याला विविध कार्यकारी सोसाट्यांमध्ये सभासद करुन घ्यावे. 5 हजार विविध कार्यकारी सोसायट्या बळकट करण्याचे उद्दिष्ट आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने सोसायट्यांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करावे. अटल महापणन योजनेच्या माध्यमातून राज्यातील 850 सोसायट्यांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. ग्रामीण भागात काम नसल्यामुळे तेथील तरुण हा आता शहराकडे वळू लागला आगला आहे. त्याला गावातच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. सोसायट्यांनी गावांच्या गरजेनुसार व्यवसाय सुरु केला पाहिजे त्यामुळे गावातील पैसा गावातच राहील तसेच सोसायाट्यांनी ठेवी गोळा करण्यावरही भर दिला पाहिजे, असे आवाहनही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेवटी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुरु करुन एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाणात वाढत आहे. बँकेनेही सायबर सेक्युरेटीच्या दृष्टीनेही पाऊले टाकली आहेत. ही बँक आता इतर बँकांच्या स्पर्धेत उतरली असून सहकार क्षेत्रातील अग्रण्य बँक आहे. शासनाने या बँकेला आणखीन ताकद दिली पाहिजे. किसान एम पे मोबाईल बँकिंग शुभारंभ हा ऐतिहासिक क्षण असून आता शेतकऱ्यांना बांधावर, पारावर बसून बँकींग व्यवहार करता येणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त बँकेच्या सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील अग्रण्य बँक आहे. ‘किसान एम पे’ मोबाईल बँकिंग सुविधा निर्माण केली आहे. यामुळे आता सभासदांना कोठुनही बँक व्यवहार करता येतील. ॲपचे प्रशिक्षण सर्व शेतकऱ्यांना दिले पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार व त्यांच्या वेळेत कर्ज द्या. बँकेने मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ केला आहे. सेक्युरेटीला ही महत्व द्या त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या, असे विद्याधर अनास्कर यांनी यावेळी सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही बँकेच्या कामाचा आढावा यावेळी सांगितला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी मानले. या कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध सहकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English Summary: Farmer M Pay Mobile Banking Facility of Satara District Central Co-operative Bank Published on: 15 September 2018, 02:39 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters